हदगाव, शेख चांदपाशा। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव आणि भोकर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणार्‍या कोंडुर ते माळेगाव दरम्यान पुलाच्या बांधकामाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माहिती देताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, 2023 च्या अर्थसंकल्पीय कामकाजात आदिवासी उपयोजनेमध्ये कोंडुर ते माळेगाव पुलाच्या विकास कामाचा समावेश करण्यात आला असून, यासाठी ३ कोटी 44 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील वाडी, वस्ती तांडे आणि आदिवासी भागातील जनतेला देखील दर्जेदार आणि मजबूत रस्ते, मिळावेत या उद्देशाने सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने हिंगोली लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. अशी खासदार हेमंत पाटील यांनी उद्घाटना प्रसंगी माहिती दिली.

सामान्य जनतेच्या हिताची विकास कामे करताना एक वेगळी ऊर्जा मिळतो अशी खासदार हेमंत पाटील यांनी प्रमाणीक पणे कबुली दिली व पूर्णत्वास गेलेल्या कामांचे भूमिपुजन करताना मनस्वी आनंद होतो. असे ते म्हणाले या विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, सहसंपर्क प्रमुख केशवराव हरण, तालुका प्रमुख विवेक देशमुख, जेष्ठ शिवसैनिक माजी जि. प.सदस्य संभाराव लांडगे मामा, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर, भाजपाचे निळू पाटील, उपजिल्हाप्रमुख राजू पाटील शेलोडेकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शीतल भांगे, डॉ. दीपक नाईक, सुदर्शन पाटील, साहेबराव पा.नेवरीकर, बालाजी राठोड, माजी सभापती तुकाराम चव्हाण, के. के. वानोळे धनराज सोनटके नरवाडे सरपंच यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व समस्त कोंडुर-माळेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version