किनवट| किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाचे व माजी आमदार प्रदीप नाईक यांचे खंदे समर्थक गजानन मुंडे पाटील यांची तर उपसभापती पदी राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाचे राहुल गेमसिंग जाधव नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आज दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी चंद्रकांत मगर यांच्या अध्यक्षते खाली निवडणूक प्रक्रीया संपन्न झाली. सभापती पदासाठी गजानन मुंडे यांचा एकमेव अर्ज तर उपसभापती पदासाठी राहुल नाईक यांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासिन अधिका-यांनी बिनविरोध निवड घोषीत केली. यावेळी संचालक अनिल पाटील, श्रीराम कांदे, प्रल्हाद सातव, प्रेमसिंग जाधव, सौ. विद्याताई दासरवार, शे.हैदर शे मुसा, कुसुम गणपत मुंडे, बालाजी बामणे, सुनिल घुगे, राजु सुरोषे, प्रमोब साबळे, गजानन बिज्जमवार यांची उपस्थिती होती.

निवड प्रक्रीया संपन्न झाल्या नंतर राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाकडुन विजयी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, जि.प चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, माजी नगराध्यक्ष साजिद खान, माजी जि प सदस्य मधुकर राठोड,बंडुसिग नाईक, माहुर बाजार सभापती दत्तराव मोहिते, माजी समन्वय समिती अध्यक्ष विनोद राठोड, माहुर बुट कमिटी अध्यक्ष मनोज किर्तणे, आदिवासी विधानसभा अध्यक्ष रामा उईके, रामदास राठोड, मारोती रेकुलवार, अजित साबळे, कचरु जोशी, ज्ञानेश्वर दहिफळे, अजय कोवे, नारायण दराडे, मनोज राठोड, संचालक जब्बार शेख, अमजद पठान, संतोष दासरवार, अनिल सुर्यवंशी पाटील, संजु मुंडे, कपिल सातव, मारोती सिंगारे, रामराव राठोड, इच्चु रमेश राठोड, अमजद पठाण, डॉ. रोहिदास जाधव, शेख सलिम शेख मदार, गोविंद धुर्वे, बाळु शेरे, महेश चव्हाण तंबाखुवाला, रुग्ण सेवक राजु राठोड यांची उपस्थिती होती.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version