हिमायतनगर। प्रेमसंबंध प्रस्थापित करून इच्छेविरुद्ध लग्न करण्याचा अट्टाहास धरणाऱ्या १७ वर्षीय पोटच्या मुलीची जन्मदात्या आई- वडिलांनी कोयत्याने वार करून हत्या केली. या घटनेनंतर खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या खून प्रकरणातील आरोपींना आज हिमायतनगर येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश महोदयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांना तपास करण्यासाठी वेळ मिळणार असून, या घटनेला अंजाम देण्यासाठी इतर कोणी सामील होते का…? या दिशेने तपास होणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील नेहरूनगर भागात राहणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी परिवार हलाकीच्या परिस्थितीत जीवन व्यापण करत होते. दरम्यान त्यांनी तीन मुलींचे लग्न लावून दिले होते. या कुटुंबातील घरी असलेल्या एका मुलिचे इतर जातीच्या युवकाशी प्रेमसंबंध जुळाले होते. यास घरच्यांनी विरोध करत मुलीस समजाऊन सांगितले तरी मयत मुलगी त्या मुलासोबत लग्न करण्याचा अट्टहास करत होती.

त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या इच्छेविरुद्ध मुलगी वागत असल्याच्या संतापाने समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने मयत कु.अंकिता हीच शुक्रवारी मध्यरात्री कोयत्याने वार करून निर्घुर्ण खून केला होता. ही घटना १ फेब्रुवारी रोजी घडली असून, खून लपविण्यासाठी खून झाल्यानंतर मुलीला हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्नालयात दाखल करून मयत अंकिताच्या खुनाला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता असे पोलिसांनी सांगितले. मात्र, यासंदर्भात शंका निर्माण झाल्याने शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी करण्यात आलेल्या शवविच्छेदनात मुलीच्या डोक्याला व ठिकठिकाणी गंभीर मारहाण झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवशंकर बुरकुले यांनी सांगितले.  

यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांना मुलीचा खून केल्याची कबुली दिल्याने हिमायतनगर पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत पंचफुलाबाई रामराव पवार, आणि रामराव पवार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात आणखी कुणाचा हात आहे का..? याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान आज खून प्रकरणातील आरोपीं माता – पित्यास हिमायतनगर येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश महोदयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांना तपास करण्यासाठी वेळ मिळणार असून, या घटनेला अंजाम देण्यासाठी यात इतर कोणी सामील होते का…? या दिशेने तपास होणार आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version