श्रीक्षेत्र माहूर। माहूर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसीलदार मुगाजी काकडे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाने जाहीर केले असून, याबाबत दि 1 रोजी दुपारी 3 वाजता पंचायत समिती मधील वसंतराव नाईक सभागृहात बैठक होणार आहे.

जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडील अधिसूचना क्र. 2025/जिबि/डेस्क-1/2-5/ग्रापंनि/सरपंच आरक्षण 2025 / सिआर 02 दिनांक 23/06/2025 अन्वये माहुर तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि स्त्रीया यांच्यासाठी राखून ठेवावयाची सरपंचाची पदे मुंबई ग्राम पंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2 अ (2) अन्वये जिल्हाधिकारी, नांदेड यांनी खालील तपशिलानुसार अधिसूचीत करुन दिले आहे.

सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे. अनुसूचित जातीसाठी 1 पद असून तेही महिलांसाठी राखीव आहे. अनुसूचित जमातीसाठी 1 पदासाठी ते पण महिलासाठीच राखीव आहे. नागरिकांच्या मागास प्रभावकांसाठी 6 पदे असून यापैकी तीन पदे महिलांसाठी राखीव आहेत खुल्या प्रवर्गासाठी 13 पदे असून यापैकी 7 सरपंच पदे महिलांसाठी राखीव आहेत एकूण एकूण 21 सरपंच पदापैकी 12 पदे महिलांसाठी राखीव आहेत.

सदरील आरक्षण हे सन 2025-2030 मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अमलात राहील. सदर प्रवर्गाच्या सरपंच पदासाठी सोडत पध्दतीने आरक्षण वसंतराव नाईक पंचायत समिती माहुर येथील सभागृहात दिनांक 01.07.2025 रोजी दुपारी 3.00 वाजता करण्यात येईल. करीता सर्व संबंधीतानी तसेच सर्व माजी जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायतीचे सरपंच/उपसरपंच, सदस्य यांनी उक्त नमुद तारखेस व वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version