भोकर। भोकर येथील 9 कॅफे चे मालक तरुण उद्योजक सचिन माधवराव वानखडे वय(२७) रा.शिवणी ता.हदगांव ह.मु.शशीदत्त नगर भोकर,यांनी दि.१ मार्च रोजी सायंकाळी सायंकाळी ६:४५ दरम्यान त्यांच्या कॅफे शॉप मध्ये छताच्या लोखंडी कडिस दोरखंड अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून भोकर पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.

हदगाव तालुक्यातील शिवणी येथील तरुण उद्योजक सचिन वानखेडे यांनी मागील वर्षी भोकर -नांदेड रोड लगत,नगर परिषद कार्यालय भोकर समोर 9 कॅफे शॉप सुरु केले होते.याच ठिकाणी कॅफे शॉप चे शटर बंद करून सचिन वानखेडे यांनी दि.१ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६:४५ वाजताच्या दरम्यान छताच्या लोखंडी कडीस दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ ते कॅफे शॉप च्या बाहेर न आल्याने परिसरातील काही नागरीकांनी ते शटर उघडून पाहिले असता सदरील घटना घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.ते जीवंत असतील व वाचविता यावे म्हणून त्यांना तात्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नेण्यात आले.यावेळी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रेया आगलावे यांनी तपासणी केली व त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

ही माहिती भोकर पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी व शासकीय ग्रामीण रुग्णालयात पोहोचले व पो.नि. सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.उप.नि. संभाजी हनवते,सहा. पो.उप.नि.संभाजी देवकांबळे व पो.कॉ.प्रमोद जोंधळे यांनी रितसर पंचनामा केला.सचिन वानखेडे यांसारख्या एका उमदा तरुण उद्योजकाने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नसून भोकर पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया व वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया आगलावे या मृतदेहाची उत्तरीय करण्याची प्रक्रिया करत होत्या.मयत सचिव वानखेडे यांच्या पश्चात आई, वडील,भाऊ,गरोदर पत्नी व एक मुलगी असा मोठा परिवार असून घरातील एक कर्ता पुरुष आणि एक होतकरू तरुण उद्योजक गेल्याने नातेवाईक,मित्रपरिवार व अनेकांतून हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version