होय तो “देवदूत” पुन्हा महाराष्ट्रात आला..! – भाजपा गजानन जोशी

नांदेड| भारताचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी गोरगरीब,कष्टकरी,मध्यमवर्गीय बांधवांसाठी आयुष्मान भारत योजना ही वैद्यकीय मदतीची सेवा सुरू केली यात ५ लक्ष रुपये पर्यन्त शस्त्रक्रिया ह्या कॅशलेस आणि मोफत केल्या जाणार आहेत.
महाराष्ट्रातील महायुती सरकारने “आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र” समिती गठीत केली असून आता पुन्हा आरोग्याचा महायज्ञ सुरू होणार आहे,उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊंचा तो संदेश पुन्हा अंमलात येणार ‘ओमप्रकाश’ पैश्या अभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू होता कामा नये..!
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आरोग्याप्रती संवेदनशीलपणा जपत आरोग्याच्या मिशनचे यशस्वी ध्येय बाळगत तत्कालीन भाजपा सरकारद्वारे २५ लाख पेक्षा जास्त गोरगरिबांना उपचारासाठी १५०० कोटी रुपये खर्च करणाऱ्या देशातील पहिल्या ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे तत्कालीन कक्ष प्रमुख आरोग्यदूत,’देव’दूत ओमप्रकाश शेटे साहेबांची ‘आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समिती’ कक्षप्रमुख पदी
नियुक्ति करण्यात आली असून,गोरगरिबांच्या मोठ्या आजाराच्या उपचाराची चिंता आता मिटणार!
राज्यातील गोरगरिबांना मोफत उपचारासाठी मदत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समिती’ कक्ष स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. या समितीत विविध विभागाचे शासकीय अधिकारी सहभागी असणार आहेत…
राज्यातील जनतेचे दररोज असंख्य फोन येतात उपचारासाठी मदत हवी आहे म्हणून,परन्तु काही तांत्रिक अडचणींमुळे वेळेत मदत मिळत नव्हती,आता जनतेच्या आरोग्यसेवेसाठीचा प्रश्न या माध्यमातून सुटला आहे. ‘आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समिती’ हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा खूप मोठा निर्णय आहे. या निर्णयामुळे गोर गरीब जनतेचा आशिर्वाद सदैव महायुतीच्या पाठीशी कायम असणार आहे… गजानन जोशी, प्रदेश का.निमंत्रित सदस्य,भाजपा
