धर्म-अध्यात्मनांदेड

स्वामी डॉ. राजेंद्र दासजीच्या संगीतमय शिवपुराण महाकथा कार्यक्रमात सर्वानी सहभागी व्हावं – बालयोगी व्यंकटस्वामी महाराज

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हादगाव – हिमायतनगर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मौजे पिंपळगाव येथे श्री मलूक पीठाधीश्वर येथील स्वामी डॉ. राजेंद्र दासजी महाराज यांच्या मधुर वाणीतून आगामी 2025 मध्ये संगीतमय शिवपुराण महाकथा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमात सर्वानी सहभागी व्हावं आणि ऐतीहासीक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे म्हणून नियोजन संदर्भात हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता चर्चासत्र बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहरातील सर्व भाविक भक्त, व्यापारी नौकरदार यांनी उपस्थित होऊन योगदान द्यावं असं आवाहन बालयोगी स्वामी महाराज व परमेश्वर मंदिर कमिटीने न्यूज फ्लॅश 360 च्या माध्यमातून केलं आहे.

नुकतंच श्री दत्त संस्थान पिंपळगाव येथील मठाधिपती बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी श्री परमेश्वर मंदिरास भेट दिली, यावेळी त्यांनी होऊ घातलेल्या धार्मिक कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी हिमायतनगर येथील लकडोबा हिंदू स्मशान भूमी विकास समितीच्या वतीने बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांचे शाल व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित भाविक भक्त नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बालयोगी व्यंकट स्वामी महाराज म्हणाले कि, मलूक पीठाधीश्वर श्री राजेंद्र दासजी महाराज (श्रीधाम वृंदावन) यांच्या मधुरवाणीतून शिवपुराण महाकथा या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन येणाऱ्या 4 मार्च 2025 ला करण्यात आले असून, हा धार्मिक कार्यक्रम सप्ताहभर चालणार आहे. या धर्म -अध्यात्म कार्यक्रमाला संबंध महाराष्ट्र्र व देशभरातून मोठं मोठे संत, महंत, पीठाधीश, मठाधीश व लाखोंच्या संख्येने भाविक भक्त सहभागी होणार आहेत. त्या कार्यक्रमाची तयारी मागील सहा महिन्यापासून पिंपळगाव येथे सुरु आहे. यासाठी भव्य जागा, पार्किंग, भोजन, येणाऱ्या- जाणाऱ्यांच्या सोइ सुविधेसाठी विविध राज्यातील संतांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले जात आहे. त्या अनुषंगाने देशभरातून येणारी अतिथींच्या सेवेसाठी लहान – थोर सर्वच जण जमेल त्या पद्धतीने सहकार्य करत आहेत. आत्तापर्यंत हादगाव- हिमायतनगर तालुक्यातील शेकडो गावामध्ये बैठक घेऊन चर्चा करण्यात आली असून, या धार्मिक कार्यक्रमाच्या सेवेसाठी हजारो लोकांचे हात सरसावले आहेत.

याचं पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता बालयोगी स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. होणाऱ्या नियोजन संदर्भात बैठकीला हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, डॉक्टर्स, व्यापारी, आजी – माजी सर्व पक्षीय पदाधिकारी व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या बैठकीला हिमायतनगर शहरातील सर्व भाविक भक्त व्यापारी नोकरदार सर्वांनी उपस्थित होऊन आगामी काळात नांदेड जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव येथे होणाऱ्या या ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमाचे साक्षीदार बनण्यासाठी आणि बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या दिव्य दर्शनाचा लाभ घेण्यासाठी बैठकीला उपस्थित व्हावं असे आवाहन करण्यात आले आहे. या शुभप्रसंगी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, मंदिर समितीचे सचिव अनंतराव देवकाते, संचालक माधवराव पाळजकर, अनिल मादसवार, विलासराव वानखेडे, संजय माने, कृषी समितीचे माजी अध्यक्ष ता.बाजारपेठ, ता. सदस्य सुभाष राठोड, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, वामनराव मिरासे, डॉ. राजेंद्र वानखेडे, सुभाष झरेवाड, रामभाऊ सूर्यवंशी, मारोती पाटील लुम्दे कार्लेकर, अभियंता श्री.डांगे, शासकीय कंत्राटदार सुरेशअप्पा पळशीकर, सुभाष शिंदे, दिलीप लोहरेकर, वऱ्हाडे सर, दत्तात्रेय काळे, परमेश्वर काळे, दशरथ हेंद्रे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!