उस्माननगर, माणिक भिसे। भारतीय अमृत महोत्सव वर्षातील ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उस्माननगर परिसरातील विविध शासकीय , निमशासकीय , कार्यालये मध्ये सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम प्रभात फेरीतून विविध देशभक्ती गितातून सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
२६ जानेवारी २०२४ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सौ. शोभाबाई शेषेराव पा.काळम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समता मा.व उच्च माध्यमिक विद्यालय येथे श्री.कमलाकरराव देशपांडे ( संस्थेचे उपाध्यक्ष ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अरबिया दारूल्लूम मध्ये साजीद भाई काझी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सम्राट अशोक प्राथमिक शाळेत संस्थाचालक तथा अध्यक्ष देवरावजी सोनसळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जि.प.प्रा.कन्या शाळेत मुख्याध्यापिका सौ.विद्याबाई वांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सेवा सहकारी सोसायटी येथे चेअरमन संजय ( रुद्र ) वारकड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शारदा वाचनालय येथे ग्रंथपाल ना.दी.पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्रिमूर्ती मा.विद्यालय येथे देवराव पांडागळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.पोलिस स्टेशन येथे सपोनि श्री शिवप्रकाश मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.प्रथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह येथे सपोनि श्री शिवप्रकाश मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सम्राट अशोक प्राथमिक शाळा , जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक ( मुलांची व मुलींची ) या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रमुख मार्गाने विद्यार्थ्यांची देशभक्ती गित वाजवत लेझीम प्रभात फेरी काढण्यात आली.बस स्टॅण्ड वर लेझीम पथक प्रभात फेरीतून सादरीकरण उत्कृष्टपणे करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि श्री शिवप्रकाश मुळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना चाॅकलेट ( गोळ्या ) चे वाटप करण्यात आले.
यावेळी गावातील ध्वजारोहणासाठी सपोनि श्री शिवप्रकाश मुळे, सपोउपनि गाडेकर ,तुकाराम वारकड गुरूजी , वैजनाथ पाटील घोरबांड , सरपंच प्रतिनिधी शेषराव पाटील काळम , उपसरपंच शेख बाशिद भाई , बाबूराव पाटील घोरबांड , माधवराव भिसे ,देवरावजी सोनसळे ,आमिन आदमनकर , संचालक तथा पत्रकार संघाचे सचिव प्रदीप देशमुख, शिवशंकर काळे , बालाजी ईसादकर ( शेकापा जिल्हा) साजीद काझी , आमिनशहा फकीर , ग्रामसेविका सौ. डि. शिंदे – माने , सुर्यकांत माली पाटील , दत्ता पाटील घोरबांड, कमलाकर शिंदे , गंगाधर भिसे, गोविंद पोटजळे, ( ग्रा.पं.स.) , यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी व गांवकरी उपस्थित होते.७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यीनी व विद्यार्थ्यी यांना महापुरुषाची वेशभूषा परिधान करून देखावे सादर करून विविध कलागुणांनी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.