नांदेड| लहान मुलाची प्रत्येक कृती ही त्याचे नवे सर्जन असते त्यामुळे मुलांना स्वतः कृती करू द्याव्यात. त्यातूनच मूल अधिक व्यापक प्रमाणात शिकू लागतं. समग्राचे आकलन होऊन व्यक्तिमत्व विकास होतो. त्यामुळे पालक शिक्षकांनी केवळ सुलभकांची भूमिका बजावावी असे आवाहन शिक्षण विभागाचे सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे यांनी आज केले.
लिटल स्कॉलर इंग्रजी शाळेच्या अक्षरा प्री प्रायमरी शाळेत आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य केदार शर्मा तर प्रभारी शिल्पा जामकर या यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
अक्षरात प्री प्रायमरी स्कूल ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा असून मुलांच्या व्यक्तिमत्व बांधणीवर विशेष लक्ष देते. सोमवार ते शनिवार प्रत्येक वारी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. आज शनिवारी गायन सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील 45 विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. अस्खलित इंग्रजी उच्चारत आणि ठेका धरून मुलांनी नृत्य केले. सादरीकरण केले. यातून प्रत्येक गटातील उत्तम सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिल्पा जामकर, अंजली देशपांडे, साधना पाठक, मनीषा जामकर, साक्षी अवस्थी, शामला कळसे, दीक्षा बनसोडे, ज्योती पांचाळ यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.