नांदेड| 16 नांदेड लोकसभा निवडणुकीच्‍याI छाननीमध्‍ये पात्र 66 उमेदवारापैकी शनिवारी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 65 उमेदवार सध्या पात्र असून सोमवारी ८ एप्रिलला तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.त्‍यामुळे ८ एप्रिल नंतर 16-नांदेड लोकसभा मतदार संघामध्‍ये अंतिम उमेदवारी निश्चित होणार आहेत. आज अपक्ष उमेदवार मोहनराव आनंदराव वाघमारे यांनी अर्ज परत घेतला आहे.

चुकीचे प्रतिज्ञापत्र, सूचकांची संख्‍या, सुरक्षा रक्‍कम जमा न करणे आदी करणांवरून शुक्रवारी 9 अर्ज रद्द करण्‍यात आले. एका इच्‍छूक उमेदवाराचे दोन अर्ज रद्द झाले. एकूण 92 अर्ज दाखल झाले होते. त्‍यापैकी 9 अर्ज रद्द करण्‍यात आले. 66 उमेदवारांनी हे अर्ज दाखल केले होते. काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. अपात्र उमेदवारांमध्‍ये विष्‍णु मारूती जाधव, अलिमोद्दीन मोहियोद्दीन काझी, माधवराव मुकींदा गायकवाड, आनंदा धोंडिबा जाधव, सुरेश दिगांबर कांबळे, दिगांबर धोंडिबा वाघमारे, आनंदा कुंडलिकराव बोकारे, सोपान नेव्‍हल पाटील यांचा समावेश आहे.

पात्र उमेदवार चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी), पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी), वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), अब्दुल रईस अहेमद (देश जनहीत पार्टी), अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी), कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग), राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी), रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलीस- ए-इन्कलाब –ए- मिल्लत), सय्यद तनवीर (बहुजन महापार्टी), सुशीला निळकंठराव पवार (सम्‍यक जनता पार्टी), हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) यांचा समावेश आहे.

तर अपक्षांमध्‍ये अकबर अख्‍तर खॉन, अक्रम रहेमान सय्यद, अनवर अ. कादर अ. कादर शेख, अमजत खा सरवर खान, अरुण भागाजी साबळे, अशफाक अहमद, असलम इब्राहीम शेख, शे. इमरान शे. पाशा, इरफान फहरुख सईद, मो. इलियास अब्दुल वहिद मोहमद, कदम सुरज देवेंद्र, कल्पना संजय गायकवाड, खान अलायार युसुफ खान, अ. खालेद अ. रफीक, गजानन दत्तरामजी धुमाळ, जगदीश लक्ष्मण पोतरे, जफर अली खाँ महेमुद अली खाँ पठाण, जुल्फेखान जिलानी सय्यद, तबस्सुम बेगम, तुकाराम गणपत बिराजदार, थोरात रविंद्र गणपतराव, देविदास गोविंदराव इंगळे,

नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसैन, नागेश संभाजी गायकवाड, नागोराव दिगंबर वाघमारे, निखिल लक्ष्मणराव गर्जे, प्रमोद किशनराव कामठेकर, फहाद सलीम शेख सलीम शेख, भास्कर चंपतराव डोईफोडे, मजीद अ. अकबर, महमंद तौफीक महमंद युसुफ, महमद मुबीन शे. पाशा, महमद सलीम महमद इकबाल, महारुद्र केशव पोपळाईतकर, अॅड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील,मोहम्मद नदीम मोहम्मद इक्बाल, मोहम्‍मद वसीम, मोहम्मद सिद्दीक शेख संदलजी, युनुस खान, युनुसखॉं युसुफखाँ, रमेश दौलाती माने, राठोड सुरेश गोपीनाथ, लतीफ उल जफर कुरेशी, लक्ष्मण नागोराव पाटील, अॅड. विजयसिंह चौव्‍हाण, विनयमाला गजानन गायकवाड, वैशाली मारोतराव हुक्‍के पाटील, शाहरुख खमर, शिवाजी दत्तात्रय गायकवाड, साहेबराव नागोराव गुंडीले, साहेबराव भिवा गजभारे, ज्ञानेश्वर बाबूराव कोंडामंगले, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्‍याची अंतिम मुदत 8 एप्रिल आहे. उदया रविवारी सुट्टीचा दिवस आहे. सोमवारी सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version