हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव तालुक्यातील तुळजापुर ते नागपुर हा राष्ट्रीय महामार्गाचे (NH361 काम जोमात झाले. हा रोड करण्यासाठी वारंगा ते हदगाव या राष्ट्रीय महामार्गावर विविध जातीचे अंसख्य मोठमोठे अंबा.. वड, पिंपळ, लिंब, बाभूळ आदी आँक्सिजन देणारे हजारो झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्या मुळे एके काळी वनराईने बहरलेल्या हा महामार्ग उनाड बनलेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील अध्याप ही वृक्षरोपण करण्यात आलेले नाही
हा राष्ट्रीय महामार्ग होऊन चार वर्ष होत असले तरी वृक्ष लागवड होत नसल्याने निसर्गप्रेमी नागरिकांत माञ या बाबतीत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या बाबतीत तिव्र अंसतोष दिसुन येत आहे. या बाबतीत या राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य महाप्रधबंधक (तक) क्षेञीय अधिकारी लक्ष देतील काय..? असा प्रश्न नागरिकांत चर्चिल्या जात आहे. शासन स्तरावरुन कत्तल केलेल्या वृक्षाच्या भरपाई करण्याची तरतूद असुन, महामार्गाच्या वृक्ष लागवड करण्याची हमी देण्यात येते. परंतु या बाबतीत कोणत्याही प्रकारचे नियम पाळण्यात आल्याचे दिसुन येत नाही. ओरड झाल्यावर वृक्ष लागवड करण्याच केवळ देखावा करण्यात येत आहे.
वारंगा ते हदगाव या राष्ट्रीय महामार्गवर दुतर्फा वृक्षनसल्याने हा मार्ग उजाड झालेल आहे. या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजुनी गवत वाढले असुन, काही प्रमाणात गवत थातुर मातुर काढण्यात आले. एकीकडे राष्ट्रीय महामार्गाच विकास झाला माञ वारंगा ते हदगाव हा राष्ट्रीय महामार्ग माञ अपुर्ण अवस्थेत असल्याने व कोणत्याही प्रकारचे या मार्गावर बामनी व मानवाडी फाट्यावर योग्य रहदारीचे नियोजन न केल्यागेले नसल्यामुळे नेहमी अपघात होत असल्याचे दिसुन येत आहे. मानवाडी फाट्यावर आता पर्यत अनेक आपघात मुळे अंपगत्व अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. निसर्गप्रेमीच्या मते यामुळे या भागात आँक्सिजन पुरवठा करणारेच वृक्षच नष्ट करण्यात आल्याने याचा परिणाम मणुष्यांना भोगावे लागत आहे. परिणामी अनेक आजारांना समोरे जाण्याची वेळ आली आहे.
एन.एच .ए. विभाग बे-फिकर..
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट अधिकारी नांदेड यांचेशी माहीती घेण्याचा प्रयत्न केला असता वारंगा ते महागांव प्रकल्पअंतर्गत वृक्षतोडी बाबत संबंधिताच मासिक अहवाल घेण्यात येत असल्याचे कळविलेले आहे. असे असले तरी वृक्ष लागवड का करण्यात येत नाही या बाबतीत स्पष्ट केल नाही हे उल्लेखनीय आहे.
खा.हेमत पाटील यांनी लक्ष घालव..!
या वारंगा ते महागाव हा राष्ट्रीय….! महामार्गाच काम अत्यंत संथगतीने झाले असले तरी हे काम योग्य पद्तीने झालेले नाही. परिणाम स्वरुप या महामार्गावर अनेक पुलांचे अर्धवट राहीलेले आहे. तसेच मानवाडी फाटा नियमित होणारे जीवघेणी आपघात विषयी दखल घ्या अशी नागरिकाची वाहनधारकांची मागणी आहे. विशेष म्हणजे वारंगा ते महागाव हा राष्ट्रीय महामार्ग खा.हेमत पाटील याच्या मतदार संघात येतो हे उल्लेखनीय आहे …!