नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल (मुले) संघाने साखळी सामन्यात गुजरात टेकनॉलॉजिकल विद्यापीठ, अहमदाबाद व कोटा विद्यापीठ संघाचा पराभव करून आगेकूच केली आहे. यजमान संघाने विजय मिळविल्याने बाद फेरीत दाखल होण्याच्या आशा बळावल्या आहेत.

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (मुले) स्पर्धेचे आयोजन दि.१४ ते १८ डिसेंबर या दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे करण्यात आले आहे. स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाल्यानंतर साखळी फेरीचे सामने सुरु करण्यात आले. त्यामध्ये यजमान विद्यापीठाने साखळी फेरीत दोन्ही सामन्यात सहज विजय मिळवला.

विविध मैदानावर झालेल्या साखळी सामन्यात विवेकानंद ग्लोबल विद्यापीठ, जयपूर, आर.टी.एम. विद्यापीठ, नागपूर, सोमय्या विद्य विहार मुंबई, आर.डी.व्ही.व्ही. जबलपूर, संजय गोडवंट व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे, मोहनलाल साखडीया विद्यापीठ, उदयपूर, लोक जागृती केंद्र विद्यापीठ, अहमदाबाद, आर.टी.यु. विद्यापीठ, कोटा, श्री गोविंद गुरू विद्यापीठ, गोध्रा, कोटा विद्यापीठ, वीर नर्मदा साऊथ गुजराआदीत विद्यापीठ, सुरत, नवसारी कृषी विद्यापीठ, नवसारी, महाराजा सयाजीराव विद्यापीठ, राणी दुर्गावती विश्वविद्यालय, जबलपूर यांनी साखळी सामन्यात विजय मिळविला.

या स्पर्धा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे प्र. संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. अंकुश पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. गंगाधर तोगरे, डॉ. महेश वाखरडकर, डॉ. भास्कर रेड्डी, संजयसिंघ ठाकूर, डॉ. निहाल खान, अनिरुद्ध बिराजदार, डॉ. सचिन चामले, डॉ. सतीश मुंडे आदी परिश्रम घेत आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version