नांदेड| जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात असलेल्या मौजे मांजरम गावची राष्ट्रीय पाणीपुरवठा योजना सन २०१८ या काळात मंजूर झाली. काम प्रत्यक्षात २०१९ या काळात सुरू झाले आहे. बारूळ येथील तळ्यामधून पाणी आणण्याचे नियोजित आहे. रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आज प्रत्यक्ष कामाची पाहणी केली येथील बारूळ विहिरीच्या कामाची तसेच रस्त्याने पाईप टाकण्याच्या कामाची पाहणी करून असमाधान व्यक्त केले.

पांडुरंग शिंदे यांनी दि.११ डिसेंबर २०२३ रोजी अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे निवेनाद्वारे तक्रार केली होती, तेव्हा पासुन काम सुरू झाले पण कामाची गती अत्यंत संथ गतीने चालु आहे. यावेळी पांडुरंग शिंदे यांनी म्हटले की,पाणीपुरवठ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अधिकाऱ्याची दुर्लक्ष होत आहे. आमच्या गावकऱ्यांना नळाद्वारे पिण्याचे पाणी भेटू नये असे काही पुढार्‍यांना आणि अधिकाऱ्यांना वाटत आहे. तेच खऱ्या अर्थाने झारीतील शुक्राचार्य आहेत.

सरकारने दिलेल्या आठ कोटीचा घशात घालण्याचा डाव अधिकारी आणि कंत्राटदार रचत आहेत पण आम्ही हा डाव त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही, लवकरात लवकर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी अन्यथा रयतक्रांती संघटना गावकऱ्यांना घेऊन घागर मोर्चा आंदोलन जिल्हा परिषद नांदेड कार्यालयासमोर करणार आहोत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version