हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ – मराठवाड्यच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी सतत तीन दिवसापासुन सुरु असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहते आहे. त्यामुळे गांजेगावच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने विदर्भ – मराठवाडयांचा संपर्क तुटून दळणवळन वहातुक ठप्प झाली आहे.

हिमायतनगर – पळसपुर – डोल्हारी मार्ग ढाणकी मधील पैनगंगा नदीवर असलेल्या गांजेगाव पुलावर पावसाळ्यात नेहमीच पाणी येत असल्याने उंची वाढवावी अशी मागणी अनेक वर्षपासून केली जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाल्यामुळे गांजेगाव पुलंच्या निर्मिती प्रतीक्षेत आहे. म्हणून खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून गांजेगाव पुलाची मंजुरी करून पावसाळ्यात वारंवार मार्गबंद होण्याची कटकट दूर करावी अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. या मागणीला अनुसरून पुलास मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप बांधकाम सुरु  झाले नसल्याने परतीच्या मुसळधार पावसामुळे गंजेगावच्या पुलावरून पाणी वाहून विदर्भ – मराठवाड्यचा संपर्क तुटला आहे.

अनेक वर्षांपासून खरीप हंगामात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहातात. त्यातच पैनगंगा नदीत ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यात येते तर कयाधू नदीचा पुरही पैनगंगेत येऊन मिसळत आसल्यामुळे नदीला महापूर येतो. या पुराचे पाणी गावानजीक नाले, नदीकाठच्या शेतात शिरून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अश्यावेळी विदर्भ – मराठवाड्याला जोडणारा गांजेगाव येथील पुलावरून पुराचे पाणी येऊन पावसाळ्यात अनेकदा हा मार्ग बंद पडत असतो. जोपर्यंत पुराचे पाणी कमी होत नाही तोपर्यंत दळणवळणासाठी नागरिकांना ३० ते ३५ किमि. दूरचा प्रवास करून आपले गाव गाठावे लागते हे वास्तव आहे.

विदर्भ- मराठवाडा- तेलंगणा – आंध्रप्रदेश – कर्नाटकला जोडलेला हा मार्ग आहे. हा रस्ता ये-जा करणाऱ्या धार्मिक दिंड्यांचा मार्गक्रमणाचा असून, तीर्थक्षेत्र माहूर, बासर, पोहरा देवी येथे भक्तांची आवक– जावक सुरूच राहते. तसेच विदर्भातील नागरिकांना अल्प खर्चातून रेल्वे प्रवास करण्यासाठी जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ राहत असल्याने या मार्गात अडसर ठरलेला पैनगंगा नदीवरील गांजेगावचा पुलाची उंची वाढऊन नव्याने बांधणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हा पूल कम बंधारा झाला तर वरील भागात पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांना साठून राहणाऱ्या पाण्याचा देखील नक्कीच फायदा होईल. आणि पावसाळ्यात विदर्भ – मराठवाड्याचा संपर्क तुटण्याचे प्रकार थांबतील व दळण- वळणातील अडथळे दूर होऊन, समोरील गावांना होणाऱ्या पुराचा धोका टळून गावकरी चिंतामुक्त होतील अशी रास्ता अपेक्षा या भागातील जनतेची आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version