
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। राज्यभरात मान्सूनचे आगमन झाले असले तरी माञ माहूर तालुक्यात पाहिजे तसा अद्याप पाऊस झाला नाही.मागील दोन ते तिन दिवसात ढगाळ वातावरण होवून अल्पसा पाऊस झाला असल्याने खरिप हंगामातील पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे.तर सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकर्यांणा माञ किडे,वाणी तसेच गोगलगाय यांच्या प्रादुर्भाव वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे.
मागील दोन ते तिन दिवसात अल्पसा पाऊस झाल्याने परिसरातील अनेक शेतकर्यांणी आपली पेरणी करुण घेतली आहे .सिंचनाची सोय असलेल्या काही शेतकर्यानी अधीच पेरण्या करुण घेतल्या असल्याने त्या शेतकर्याचे पिक उगवले आहे.परंतु अनेक वेळा किडे आणि अळ्या यांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना आपले पीक गमवावे लागते. सध्या पावसाळा सुरू असून पिकांवर वाणी व गोगलगायांनी हल्ला चढवला असल्याची माहिती वाई बाजार परिसरातील काही शेतकर्याकडून मिळाली आहे.
पिकांची उगवण होत असतानाच म्हणजेच रोपटे कोवळे असतानाच त्यांना खाऊन टाकण्याचे काम वाणी व गोगलगाय करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाणू,गोगलगाय ही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी झाली असून उत्पनात घट येत असल्याने शेतात वाणी, गोगलगाय अन् काय करेल धरणी माय अशी म्हणण्याची वेळ आता शेतकर्यावर आली आहे.
एकात्मिक व्यवस्थापन.
१ ) शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले काडी कचरा गोळा करुन नष्ट करावा. वाणी रात्री सक्रीय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढिग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत. २) शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करुन बांधावरील गवत व दगड काढून बांध मोकळा ठेवावा बऱ्याचदा आर्द्रता, घनदाट पिकात जास्त पाणी दिल्यामुळे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास वाणीचा प्रादुर्भाव वाढतो.
३) जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसातच वाणी मरतात. ४) ज्याठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीपुर्वी बियाण्याला बिजप्रक्रीया केली आहे. तेथे वाणीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे. ५) पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होतील. ६) चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गीक नियंत्रण होते.
रासायनिक व्यवस्थापन….
ही कीड संपूर्ण शेतात पसरली असल्यास क्लोरोपायरीफॉस दहा टक्के दाणेदार किंवा फिप्रोनील ०.३% दाणेदार या यापैकी कोणत्या एका कीटकनाशकाची निवड करून पाच किलो प्रति हेक्टर १०० किलो शेण खतात मिसळून ओळीने शेतातील रोपाजवळ वापर करू शकता.या कीटकनाशकाचा वापर करण्यापूर्वी स्थानिक तज्ञांचा सल्ला घेऊन लेबल क्लेम शिफारसी प्रमाणेच व लेबल क्लेम शिफारस तपासूनच गरज असेल तरच वापर करावा. बालाजी मुंडे, कृषी अधिकारी माहूर.
