नांदेड। कलंबर ता.लोहा येथील संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून क्रिडाक्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्याचे कौतुक केले जात आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे १ , जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड जिल्हा , ॲथलेटिक्स संघटना , नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सन २०२२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत कलंबर ता. लोहा येथील संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये इयत्ता ११ वी तील विज्ञान शाखेतील विद्यार्थी भोकरे संगमेश्वर निवृत्ती याने ६०० मीटर हर्डल्स या मैदानी क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावला. तर इयत्ता बारावी तील विज्ञान शाखेतील विद्यार्थी प्रशिक साहेबराव कांबळे याने थाळी फेक स्पर्धेत १७.६० मी. लांब थाळी फेकून जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक पटकावला.
या दोन्ही विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव जिल्ह्यात चमकावल्या बध्दल समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबरचे अध्यक्ष श्री. मारोतराव पाटील घोरबांड , संस्थेचे पदाधिकारी , शाळेचे मुख्याध्यापक श्री.मामडे , प्रशिक्षक प्रा. भुयारे , सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे क्रिडाक्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.