स्वस्त आणि मस्त उबदार वस्तुंच्या दालनाचे उद्घाटन संपन्न
नांदेड| हिंगोली गेट जवळील सचखंड गुरूद्वारा मैदानात तिबेटीयन बाधवांच्या गरम ऊलन शॉल, स्वेटर, जर्शी, हातमोझे, पायमोझे, मफलर, विविध रंगाच्या व ढंगाच्या टोप्या अदि स्वस्त आणि मस्त वस्तूंच्या दालनाची सुरूवात नांदेड भूषण, ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते बालरोग तज्ज्ञ डॉ.हंसराज वैद्य व सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक ठाणसिंघजी बुंगई यांच्या शुभ हस्ते फित कापून मोठ्या थाटामाटात झाली.
या प्रसंगी गुरूद्वारा बोर्डाचे सहाय्यक अधिक्षक ठाकूर सिंघजी बुंगई, हरपाल सिंघजी, प्रेमसिंघजी रामगडीया, तिबेटीयन बंधू भगीनी तथा नांदेड नगरीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. तिबेटियन बंधूनी मान्यवर अथितींचे शॉल, मिठाई देवून गुलाब पुष्प उधळून जंगी स्वागत केले. तिबेटीयन महिला व पुरूष बंधू भगीनींनी त्यांच्या सांस्कृतिक पद्धतीनी विशेष सामूहिक नृत्य व गीत सादर केले. मान्यवरांनीं त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.