हिमायतनगर| जगदगुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या माध्यमातून हिमायतनगर तालुक्याच्या वतीनं ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपस्थित होऊन स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पाटील व सुरज दासेवार यांनी रक्तदान केलं. याबद्दल त्यांचा स्वागत करून आमदार जवळगावकर यांच्याहस्ते प्रमाणात देऊन गौरव करण्यात आला.
प्रथमतः स्वामी नरेंद्रचार्य महाराजांच्या भक्तांच्या वतीने स्वामीजींच्या प्रतिमेची महाआरती करण्यात आली. त्यानंतर आमदार माधवराव पाटील जवळगावकर व त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे कारण व महत्त्व पत्रकार गंगाधर पडवळे यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी आमदार जवळगावकर म्हणाले की, मी देखील स्वामीजींचा भक्त आहे, प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात मी अवश्य उपस्थित होतो. दानामध्ये सर्वात श्रेष्ठदान म्हणजे रक्तदान आहे सर्वांनी रक्तदान करावे. आणि स्वामी नरेंद्रचार्य महाराजांनी दाखविलेल्या भक्ती मार्गावर जीवन व्यापंन करावे. जिथे कुठे धार्मिक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी माजी सेवा समर्पित राहील असे आश्वासन त्यांनी दिले. रक्तदान करण्यासाठी शहरासह तालुक्यातील महिला, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झाली होती.
यावेळी हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक एस.डी. जराड, शहराध्यक्ष संजय माने, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, चेयरमन गणेशराव शिंदे, डॉक्टर राजेंद्र वानखेडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस आशिष सकवान, भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, योगेश चिलकावार, संजय सूर्यवंशी, अब्दुल बाखी, सुभाष शिंदे, पंडित ढोणे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. या शिबिरासाठी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला पुरुष भक्तमंडळी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.