श्रीक्षेञ माहूर,कार्तिक बेहेरे। किनवट-माहूर मतदार संघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांची विविध सार्वजनिक गणेश मंडळाना भेटी देऊन गणराचे दर्शन घेतले आणि श्रीगणेशाची आरती केली.यावेळी नाईक यांचा विविध मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील वाई बाजार येथील श्री गुरुदेव मंदीरात स्थापण करण्यात आलेल्या श्री शिवा गणेश मंडळासह येथील विविध गणेश मंडळाला मा.आमदार प्रदीप नाईक यांनी भेट देऊन सन्मानजनक देणगी गणेशाच्या चरणी अर्पण केली.याप्रसंगी श्रीशिवा गणेश मंडळाचे अध्यक्ष ओंमकार खराटे व सदस्यांनी नाईक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.त्याच बरोबर जि.प.चे माजी. उपाध्यक्ष समाधान जाधव यांचा हि सत्कार केला.याप्रसंगी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थानी विविध समस्यावर चर्चा करून त्यावर लक्ष देण्याची विनंती केली.

मा.आमदार नाईक यांचे समेवत माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते,विनोद राठोड,नावेद खान,अमजद खान,अञीनंदन शिंदे,नितिन कदम,अनूप गेंटलवार,रोणीत पबीतवार,पञकार कार्तिक बेहेरे तर मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष गणेश हिवाळे,कोषाध्यक्ष प्रतिक बेहेरे,ओंमकार सातव,प्रतिष कट्टकमवार,अदित्य लुटे,शुभम सातव,श्रिजय गवळी,संस्कार पबीतवार, संकेत सलाम,संकेत सातव,अभय तंलाडे, गणेश सलाम,श्रीनाथ थोंटे,आदेश सुरोशे,रोहित माणे, योगेश उदीमकर,मथंन पवार,यांचेसह महाविकास आघाडीतील अनेक कार्यकर्त्ये व पदाधिकारी उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version