बिलोली, गोविंद मुंडकर। बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे आज दि.२६/२०२४ मे रोजी सगरोळी शासकीय रेती घाट क्र.०२ सगरोळी येथून घरकूल लाभार्थी श्री दत्तु शंकरराव मनधरणे रा.केसराळी ता.बिलोली जि.नांदेड हे घर बांधकामासाठी वाहन परवाना क्र.etp No १७८४९६१३ वाहन क्र.एम. एच.०४ एफ.जे ९७०९ ह्या वाहनाने घरकूलसाठी ०५ ब्रास रेती घेऊन जात असताना सगरोळी येथील श्री गंगाधर शक्करवार यांच्या आडत दुकानाजवळ केसराळीकडे जाणाऱ्या कॉर्नर वर दुचाकी वाहनास अपघात झाला. आपघातात हिप्परगा थडी येथील युवक व सगरोळी येथील युवक यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे.

वाळू डेपो क्रमांक दोन मधून भरून निघालेले हायवा क्रमांक एम एच ०४ एफ.जे.९७०९ हे सगरोळी येथून केसराळीकडे जात असताना समोरून येत असलेल्या दुचाकी क्रमांक टी.एस.१६ इ.वाय. ८६७८ ला जोराची धडक दिली या धडकेत दुचाकी वरील मोईन वजीरसाब शेख वय (३५ )राहणार हिप्परगा तालुका बिलोली व नवीन संग्राम पवार वय (२५ )रा. सगरोळी या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

बिलोली तालुक्यात सध्या वाळू डेपोच्या नावाखाली शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करीत ठेकेदार मंडळी रात्रंदिवस अवैधरित्या वाळूचे उत्खनन करीत याकडे प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version