नांदेड। पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्हयातील रेकॉर्डवरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे आरोपीची योजना तयार करुन आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने चालु वर्षात 27 MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे.

पोलीस ठाणे नांदेड ग्रामिण यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे बलजीतसिंघ ऊर्फ सल्लु गुरुदत्तसिंघ भाटीया, राहणार- बाबा दिपसिंघ गुरुव्दारा, कौठा, ता. जिल्हा नांदेड याचेवर गंभीर स्वरुपाचे दखलपात्र 10 गुन्हे दाखल असल्याने तसेच पोलीस ठाणे भाग्यनगर यांचेकडुन सराईत गुन्हेगार शुभम आशोक वायवळ (वाघोळे), राहणार- शंकरनगर, बेलानगरजवळ, नांदेड याचेवर गंभीर स्वरुपाचे 09 गुन्हे दाखल असल्याने त्यांचेविरुध्द एम. पी. डी. ए. अधिनियमाप्रमाणे प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे प्राप्त झाले होते.

मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन मा. श्री अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हे धोकादायक व्यक्ती असल्याने आरोपी नामे 1) श्री. बलजीतसिंघ ऊर्फ सल्लु गुरुदत्तसिंघ भाटीया, राहणार- बाबा दिपसिंघ गुरुव्दारा, कौठा, ता. जिल्हा नांदेड 2) श्री. शुभम आशोक वायवळ (वाघोळे), राहणार- शंकरनगर, बेलानगरजवळ, नांदेड यांना एक वर्षाकरीता हर्मुल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहे. नमुद दोन्ही आरोपीतांना हसुल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. यापुर्वी नांदेड जिल्हयातील 06 गुन्हेगांराना MPDA कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले होते, आता ती संख्या 08 झाली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version