भोकर। भोकर- म्हैसा रोड वर पोमनाळा नाजिक ऑटो- कार मध्ये झालेल्या अपघातात दोन जण गंभीर तर अन्य एकजण जखमी. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर असल्याने ऑक्सीजनसह अंबुलन्सने नांदेड ला पाठवण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावर भोकर – म्हैसा रोडवर पोमनाळा जवळ ऑटो क्रमांक AP 01 Y-9663 कार क्रमांक MH 14 FC – 2681 यांच्यात झालेल्या भिषण अपघातात अनन्या भागवत ( वय 4 ) रा .छत्रपती संभाजी नगर राजाबाई पांडुरंग जगदाने (वय 42) रा .दिवशी खुर्द, ह्याना डोके,मानेला जबर मार लागल्याने बेशुद्ध आवस्थेत असल्याने कर्तव्यावर असलेले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कळसकर यांनी त्यांना प्राथमिक उपचार करून व ऑक्सीजन ची अवश्यकता असल्याने त्याची पूर्तता करून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवून देण्यात आल्याचे डॉ.यांनी सांगितले.

तर निकिता मुंगल (गर्भवती महिला वय 24 ) बेंबर ह्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दाखल करण्यात आले असल्याचे समजते. सदरील अपघात झाल्याचे समजताच भोकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनरीक्षक प्रल्हाद बाचेवाड,व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवन्याकामी जुनेद पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ मदत करून वरील पोलीस कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version