उस्माननगर, माणिक भिसे। वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक नांदेड व जिल्हाधिकारी, आणि वनपरिमंडळ लोहा यांच्या मार्गदर्शनाखाली नियतक्षेत्र माळाकोळी क्षेत्रातील मौजे वागदरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी ,व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावात वृक्ष लागवड व वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. वन्यजीव सप्ताह निमित्त नियतक्षेञ माळाकोळी अंतर्गत वागदरवाडी येथील जि.प.प्रा. शाळेत जनजागृती, वृक्ष लागवड राबविण्यात आले .
वन्यजीव सप्ताह निमित्त श्री केशव वाबळे साहेब उपवनसंरक्षक नांदेड , भिमसिंग ठाकूर साहेब सहायक वनसंरक्षक ,संदिप शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक नांदेड यांच्या नियोजनाखाली वनपरिमंडळ लोहा अंतर्गत नियतक्षेञ माळाकोळी क्षेत्र वागदरवाडी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त जि.प.प्रा.शाळा या गावात वृक्ष लागवड व वन्यजीव सप्ताह राबविण्यात आले.
यावेळी श्री. क्यादरवाड यांनी वन्यप्राणी व वृक्षलागवड या विषयावरील परिसंवादात बोलताना म्हणाले की , प्रत्येक नागरिकांनी एक तरी वृक्ष ( झाड ) लावून जोपासना केली पाहिजे . वृक्षवल्ली आम्हा सोयरे….याम्हणी प्रमाणे वृक्षांची लागवड केली तर आपणास सावली , ऑक्सिजन’ मिळते. अशा अनेक गोष्टींचा विचार करून नागरिक विद्यार्थी यांनी वृक्षांवर प्रेम केले पाहिजे.