हिमायतनगर,परमेश्वर काळे। मंगरूळ गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलासह गावातील रस्ते विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणार असून या गावच्या विकासाला निधी कमी पडणार नाही असे आश्वासन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे.
मंगरूळ गावकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सत्कार सोहळ्यासह आयोजन करण्यात आले होते. मंगरूळ ग्रामस्थांनी आ जवळगावकर यांचे ढोल ताश्याच्या गजरात जंगी स्वागत केले. या सत्कार सोहळ्यात बोलताना आ. जवळगावकर म्हणाले की मंगरूळ गावकऱ्यांच्या गावातील विकास कामासाठीच्या मागण्या लवकरच पुर्ण करू गावातील पाण्याचा प्रश्न, रस्ते, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहासाठी दहा लाखाचा निधी देण्याची घोषणा केली आहे.