नवीन नांदेड। धनेगाव – मुजामपेठ येथुन नांदेड -लातुर ३६१ मुख्यमार्ग जात असुन या महामार्गाच्या दोन्ही बाजुला धनेगाव – मुजामपेठ ग्रामपंचायतीची हद्द असल्याने ह्या मार्गावरुन येणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायतीच्या व इतर कामासाठी या ररस्त्याला दोन किलोमिटर रस्ता ओलाडुन या गावात यावे लागणार असून पावसाळ्यातील पडलेल्या पाण्यामुळे या रस्त्यामुळे आडत असूनया संबंधी गुत्तेदार व जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी विनंती करुन सुध्दा या भागाला जोडणारा रस्ता व सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने, यासंबंधी नादेड दक्षिणचे आ. मोहनराव हंबर्डे व ग्रामस्थानी हा प्रश्न निकाली लागे पर्यत रस्त्याचे काम थांबवावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली असून संबधित कामाचा ठिकाणी आ. हंबर्डे व रस्ता प्रकल्पाचे अधिकारी ,व्यवस्थापक यांनी पाहणी केली असून जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत काम बंद ठेवण्याचा ईशारा दिला आहे.
धनेगाव/मुजामपेठ ग्रामपंचायतीच्या हद्दीतुन नांदेड – लातुर महामार्ग जात आहे ,या महामार्गाच्या बांधकाम सुरु असून या महामार्गामुळे धनेगाव – मुजामपेठ यातील अंतर कमी होण्या ऐवजी ते वाढले आहे, धनेगाव – मुजामपेठ हि ग्रामपंचायत एक असली तरी हे दोन्ही गावे आजुबाजुला असुन नांदेड -लातुर हा महामार्ग जात असल्याने यावर महामार्गाचे बांधकाम अंतीम टप्यात आले आहे ,या रस्ता बांधकामामुळे या गावातील नागरिकांना दोन किलोमिटरचे अंतर पार करुन जावे लागणार आहे.
यासाठी महामार्गाने धनेगाव ग्रामस्थांसाठी नांदेड – हैद्राबाद मुख्य रस्ता रहदारीसाठी असल्याचे सांगत आहेत,परंतु धनेगाव ग्रामस्थांना नांदेड शहरात येण्यासाठी हाच रस्ता सोपा आहे ,त्यातच मुजामपेठ येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना हाच रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचा वापर होत असल्याने या रस्त्यावर पुल व्हावा व दोन्ही गावाचा संपर्क व्हा यासाठी या रस्त्यावर पुल करण्याची मागणी होती . तर धनेगाव चौकात छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्यांची नियोजीत जागा होती,पंरतु गुत्तेदारांनी भव्य पुतळा बांधकाम करुन देण्याचे आश्वासन देवुन येथील जागा खाली करुन घेतली असून अद्यापही या सुशोभीकरण केले नाही.
धनेगाव हे गाव मुख्य रस्त्यावरुन खोल असल्याने या रस्त्या बांधकाम करताना महामार्गच्या गुत्तेदारानी नाल्याचे बांधकाम उचलुन घेतल्याने धनेगाव गावात नैसर्गिक पावसाळ्यात साचणारे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने हे पाणी लोकवस्तीत जात आहे ,तर धनेगाव ग्रामस्थानच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी राज्य शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन या गावाला विष्णुपुरी येथील जलाशयातुन पाणी पुरवठा करणारी जल वाहिनी रस्ता नसल्याने या ग्रामस्थांचा पाणी प्रश्न जैस थे राहिला आहे .
या महामार्गामुळे अनेक प्रश्न उभे असुन हे तात्काळ सोडवावेत यासाठी धनेगाव – मुजामपेठ ग्रामस्थाच्यावतीने ,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण खा.प्रताप पाटील चिखलीकर ,आ.मोहनराव हंबर्डे यांना लेखी निवेदन दिल्यानंतर दि १६ आक्टोबर रोजी ग्रामस्थ व गुत्तेदार यांच्यात समन्वय व्हायला पाहीजे यासाठी आ.हंबर्डे यांनी या रस्त्याची पहाणी करत सुचना केल्या परंतु गुत्तेदारांनी मनमानी केल्याने संतप्त झालेल्या ग्रमस्थांनी जो पर्यत आमच्या मागण्या सुटत नाहीत,तो पर्यत काम होवु देणार नसल्याचा पवित्रा घेतल्यानंतर गुत्तेदार व प्रकल्प संबधित अधिकारी निघून गेले,यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,धनेगाव ग्रामपंचायत सरपंच गंगाधर ( पिंटु) शिंदे ,गंगाधर कवाळे ,माजी पंचायत समिती सदस्य भुंजगराव भालके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ,विवीध प्रतिष्ठानाचे व्यापारी ,युवक यांनी आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.