नांदेड। हिवताप विकास सहकारी पॅनलचा प्रचार दौरा, महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतपेढी म.नांदेड यांची संचालक मंडळ निवडणूक २०२३-२०२८ करीता प्रचार दौरा निमित्त आज मुदखेड, शिंधी, उमरी, करखेली, धर्माबाद, कुंडलवाङी, बिलोली व देगलुर येधे प्रचारात आघाडी मतदार सभासद यांचा उस्फूर्त प्रतिसाद दिला सर्व ठिकाणी मतदार यांनी यथोचित मान, सन्मान व सत्कार केला.
विकास सहकारी पॅनलच्या सर्व उमेदवार यांच्या ” शिलाई मशीन ” या निशाणीवर मतदान करून प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे सर्व मतदार यांनी विजय आपलाच अशी हमी व ग्वाही दिली.
विकास सहकारी पॅनल प्रमुख, उमेदवार व हिवताप पतसंस्थेचे चेअरमन सर्वश्री सुभाष कल्याणकर, माणिक गिते, पप्पू नाईक देसाई, सत्यजीत टिप्रेसवार, मोहन पेंढारे, चंद्रभान धोंडगे, बालाजी आळणे, मनोहर खानसोळे, अशोक ढवळे, विठ्ठल मोरे, संतोष माकु, व्यंकट माचनवाड, गिरीश पाटील उमेदवार, आरोग्य सहाय्यक बालाजी कल्हाळे,आरोग्य कर्मचारी व्यंकटी बकाल, शाम सावंत उपस्थित होते.
व्याज दर एक टक्काने कमी केले, दिर्घ मुदती कर्ज मर्यादा पाच लाखचे सात लाख, सात लाखचे दहा लाख केले, आकस्मिक कर्ज मर्यादा पन्नास हजार केले, मयत झाले तर त्यांच्या परिवारास सानुग्रह अनुदान पाच हजार वरुन दहा हजार केले व आता दिर्घ मुदती,आकस्मिक कर्ज मर्यादा वाढ, सानुग्रह अनुदान वाढ करण्यात येणार आहे. लवकरच विमा सर्व सभासद यांचा काढण्यात येणार आहे. संस्थेची प्रशस्त ईमारत, नविन वास्तु घेण्यात येणार आहे अशी माहिती विकास सहकारी पॅनलच्या वतीने दिली.
विकास सहकारी पॅनलचे उमेदवार यांच्या ” शिलाई मशिन ” या निशाणीवर दि.२२ ऑक्टोबर २०२३ रोज रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत नांदेड येथील कार्यालयात मगनपुरा येथे मतदान करुन प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आश्वासन सर्व सभासद यांनी दिले.