
नांदेड। नांदेड शहर व तरोडा उपनगरातील नाले साफसफाई, आपत्ती व्यवस्थापन व रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्यात यावीत अशी मागणी करणारे निवेदन माजी उपमहापौर सतीश देशमुख (तरोडेकर) यांनी महापालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे यांच्याकडे केली आहे.
नांदेड शहरातील व तरोडा भागातील कामे अत्यंत संथगतीने चालु आहेत. हि कामे पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्यासाठी वाढीव मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचा पुरवठा करुन लवकरात लवकर पूर्ण करने अवशक आहेत. जेणेकरुन पावसाळ्यामध्ये नाले तुंबुन रस्त्यावर पाणी येऊन व सकल भागात पाणी साचून नागरीकांना याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व विषय अत्यंत महत्त्वाचे आणि गंभीर असून, या बाबतची तातडीने दक्षता घेऊन, योग्य त्या उपायययोजना कराव्यात, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
हवामान खात्याने या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाजे व्यक्त केला आहे. पावसाळी गटारांची वहनक्षमता कमी असल्याने पाणी वाहून जाण्याला मर्यादा येतात. नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई झालेली नाही. ती त्वरित करुन घ्यावी अशी सूचना माजी उपमहापौर सतीश देशमुख यांनी आयुक्ताना केली आहे. शहरात वेळी अवेळी पाणी सोडले जात असून त्यांचे योग्य नियोजन करावे, गोदावरी शुद्धीकारणाची मोहीम राबविण्यात यावी,नांदेड मधे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे अशी सूचना तरोडेकर यांनी केली.
