नांदेडराजकिय

Ubt Shivsena ; उद्या माहूरात उबाठा शिवसेनेची आढावा बैठक; दानवे,थोरात,आष्टीकर,खराटे यांची प्रमुख उपस्थिती

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। उद्या दि.११ मार्च रोजी माहूर येथील शासकीय विश्रामगृहात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची आढावा बैठक होणार आहे.या बैठकीला महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, संपर्क नेते बबनराव थोरात, हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर, शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे हे उपस्थितीत राहणार असल्याची माहिती.

पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीच्या दृष्टिकोनातून राज्यभरातील पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आणि पक्षातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आढावा बैठकीचे आयोजन केले जात आहेत.उद्या दि.११ मार्च रोजी माहूर येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी ९:३० हि बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीला विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, संपर्क नेते बबनराव थोरात, हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर,शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा किनवट- माहूर विधानसभा मतदार संघातील सर्व शिवसेना-युवासेना महिला आघाडीच्या आजी माजी पदाधिकारी शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख किनवट मारुती दिवसे पाटील,माहूर तालुका प्रमुख उमेश जाधव यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!