नांदेड| महाराष्ट राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस यांच्या विद्यमाने नांदेड भारत स्काऊटस आणि गाईडस तथा शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या द्रारे दिनांक 11.10.2023 ते 17.10.2023 या कालावधीत नांदेड भारत स्काऊटस आणि गाईडस जिल्हा कार्यालय, वझिराबाद नांदेड येथे स्काऊट प्राथमिक प्रशिक्षण व प्रगत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिरास शिबिर प्रमुख म्हणुन प्राथमिक प्रशिक्षणास श्री. गोविंद केंद्र राज्य प्रशिक्षण आयुक्त (स्का) व प्रगत प्रशिक्षणास श्री काशीनाथ बुचडे एल. टी (स्का) तर सहाय्यक म्हणून श्री गजानन गायकवाड, जिल्हा संघटक, यवतमाळ, जनार्दन इरले जिल्हा संघटक स्काऊट,नांदेड शिबीर सहायय्क म्हणून नांदेड जिल्हयातील श्री. रमेश फुलारी, श्री. शशिकांत मस्के, श्री. हेंमत बेंडे, श्री विनोद सोनटक्के, श्री बालाजी तोरणेकर, श्री वाकोडे सर, यांनी कामकाज पाहीले. सदर शिबिरास राज्य कार्यालयाचे माजी राज्य प्रशिक्षण आयुक्त श्री गिरिष कांबळे एल. टी. (स्का) यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
तसेच जिल्हयाचे गाईड संघटक श्रीमती शिवकाशी तांडे तसेच जिल्हा प्रशिक्षण आयुक्त श्रीमती भागीरथी बच्चेवार यांनी मार्गदर्शन केले तसेच लातुर जिल्हयाचे जिल्हा संघटक श्री शंकर चामे, अमरावती जिल्हयाचे जिल्हा संघटक रमेश जाधव, तसेच त्यांनी निसर्ग निवास, पायोनियरिंग, कुकींग, प्रवेश, प्रथम सोपान अभ्यास क्रमाविषयी माहीती तसेच मुलांना राज्य पुरस्कार व राष्टपती पुरस्कार करीता करावयाची तयारी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सदर प्रशिषण यशस्वीतेकरीता जिल्हा कार्यालय कर्मचारी श्री. विशाल ईश्वरकर, अनुराधा कोटपेट, संजय गुडलावार यांनी सहकार्य केले. मा.जिल्हा मुख्य आयुक्त श्रीमती सविता बिरगे शिक्षणाधिकारी (प्राथमिक),जिल्हा परिषद, नांदेड, जिल्हा आयुक्त (स्का) श्री प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जिल्हा परिषद, नांदेड, यांनी जास्तीत जास्त जिल्हयातील शिक्षकानी सदर प्रशिक्षण पुढेही घेण्याचे आव्हाण केले.