
नवीन नांदेड। सामाजिक व प्रशासकीय आरोग्य सेवा ऊत्कृष्टरित्या केल्याबद्दल शंकरराव गंगाराम धिरडीकर सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी वर्ग २ सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांना सिडको येथील कामगार कल्याण क्रेंद येथे आयोजित जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड छावा श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव यशवंत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सिडको येथील कामगार कल्याण क्रेंद येथे २८ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती महोत्सव २४ , जिजाऊ व्याखानमाला व गोरव कृत्तवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी अध्यक्ष शंकरराव हंबर्डे, तर प्रमुख पाहुणे शे. रा. पाटील, डॉ. रेणुका मोरे, पंढरीनाथ बोकारे, नरेश भोसले, संदीप शिंदे, डॉ. विजयानंद भोगं, स्वागत अध्यक्ष अनिल धमणे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप , आयोजक भास्कर हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत शंकरराव धिरडीकर यांना सन्मान चिन्ह,शाल श्रीफळ फेटा बांधुन सत्कार करण्यात आला, पुरस्कार मिळाल्याबद्दल नांदेड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष जिवन पाटील घोगरे, माजी नगरसेवक अशोक मोरे आंनदराव गायकवाड, अहातखाॅन पठाण, दत्तात्रय कुलकर्णी, वामनराव देवसरकर,देविदास कदम, प्रल्हाद गव्हाणे,राजु लांडगे,अशोक वटमवार,व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.
