हिमायतनगर। विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या हिमायतनगर ते पळसपुर मार्गे डोलारी पेनगंगा नदी गांजेगाव उमरखेड जाणारा जिल्हा सीमा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असल्यामुळे येथील नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधी कडे तक्रारी कराव्या लागले आहे. मात्र यास काही मुहूर्त मिळाला नसल्याने डोल्हारी ते पैनगंगा नदी पुलापर्यन्त रस्त्याचि दुरुस्ती करण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली आहे.
या रस्त्यासाठी आत्तापर्यंत हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जळगावकर व हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्याकडे सुद्धा या रस्त्याच्या मागणीची निवेदन देऊन सुद्धा या रस्त्यावर कोणत्याही लोकप्रतिनिधी लक्ष न दिल्यामुळे या भागातील नागरिक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या रस्त्यावरून चार बाजारपेठ असल्याने आणि एक हिमायतनगर येथे रेल्वे स्टेशन असल्याने विदर्भ मराठवाडा जोडणारा राज्य जिल्हा सीमा रस्ता आहे.
त्यामुळे नाईलाजाने हा रस्ता आज दिनांक 16 रोजी पळसपुर येथील जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा चेअरमन चांदराव वानखेडे पळसपुर यांच्यासोबत विदर्भ येथील ढाणकीचे प्रवासी महामंडळाचे तालुका अध्यक्ष शेख इरफान व त्यांचे सहकारी चव्हाण यांच्यासोबत जीवाचं रान करून त्या ठिकाणी स्वखर्चातून नागरिकांच्या लोकवाट्यातून जेसीबी लावून तात्पुरता दुरुस्ती करून घेतली आहे
त्या रस्त्याच्या दुरुस्ती मूळ पावसाळ्यात बंद झालेली एसटी महामंडळ बस सुरू व्हावी अशी मागणी आहे. यासाठी उमरखेड आगाराच्या व आंध्र प्रदेश तेलंगणा येथील म्हैसा आगाराच्या एसटी बस काही दिवसातच सुरू करण्याचा खटाटोप होत आहे, त्यामुळे रस्त्यावर आसलेल्या खड्ड्यात मुरूम टाकून बस चालवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे या चित्रावरून स्पष्ट दिसत आहे. तर याकडे या भागातील लोकप्रतिनिधी सह बांधकाम विभाग लक्ष देईल का..? असा प्रवाशातून सवाल होत आहे