नांदेड। जिल्हयातील नवदुर्गा महोत्सव निमीत्त महिला सशक्तीकरण व संरक्षणा करीता दिनांक 17.10.2023 ते दिनांक 24.10.2023 दरम्यान पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा जनजागृती चे आयोजन करण्यात आले असुन मा. डॉ. शशीकांत महावरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड, परिक्षेत्र नांदेड यांचे हस्ते व मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड व इतर मान्यवरांचे उपस्थितीत कुसम सहभागृह नांदेड येथे सदर मोहिमेची सुरवात नवदुर्गाचा सन्मान करून करण्यात आली.

सदर कार्यक्रमामध्ये नांदेड शहरातील सर्व महाविद्यायल शाळा, क्लासेस या ठिकाणावरून 1000 ते 1200 मुलींनी हजर राहुन मोठया संख्येने प्रतिसाद देवून सहभाग नोंदवला. उपस्थित महिला व मुलींना महिला पोलीस अधिकारी यांनी सुरक्षेततेबाबत तसेच सायबर सेल, सेल्फ डिफेन्स टेक्निक, पोक्सो कायदा, डायल-112, दामिनी भरोसा सेल इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच दिशा फॉउंडेशन अमरावती चे संचालक प्रविण खानपसुळे यांनी व त्यांचे सुविध्य पत्नी यांनी मुलींना जबाबदारी जाणीव व जागृती पर मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणारे महिलांचा मान्यवरांचे हस्ते नवदुर्गा सन्मान देवून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, नांदेड रेल्वे विभाग व्यवस्थापक निती सरकार, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर (न्यायाधिश), मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. डॉ. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, मा. श्री सुशिलकुमार नायक. उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, डॉ. श्रीमती अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु) नांदेड य शहरातील सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी व पत्रकार, प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नांदेड जिल्हयात व शहरात महिला सशक्तीकरण व सुरक्षा जनजागृती करण्यासाठी माध्यमिक शाळा. महाविद्यालय, क्लासेस, आश्रमशाळा, निवासी शाळा या ठिकाणी महिला अधिकारी यांची टिम पाठवून महिला व मुलींना या विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. सदरची मोहिम मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली महिला अधिकारी मसपोनि वाठारे, शिंदे, मपोउपनि प्रियंका आघाव, प्रणिता बाभळे, देशमुख, पिंपरखेडे, हिना शेख, ज्योति वालेगावे, कदम, काळे, गंगुताई नर्तावार हे पार पाडणार आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version