नांदेड, अनिल मादसवार। या ना त्या कारणाने नेहमीचं चर्चेत असणाऱ्या किनवट जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात सावळा गोंधळ नेहमीचं चाललेला असतो आणि त्यातल्या त्यात प्रभारीराज मुळे गुत्तेदार आणि शाखा अभियंता यांचे चांगभले होताना दिसतं आहे. या महाभागांनी तर आमदार निधीच्या कामांची तर अक्षरशः वाट यांनी लावलेली आहे. अशी तक्रारधारकाने पुरव्यानिशी तक्रार केलेली असताना आणि खुद्द प्रभारी अभियंता यांनी चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत बिल काढू नका असे आदेशित केलेले असतानाही सदरील बोगस आणि निकृष्ट दर्जाचा कामाची बिले निघतात कशी…? हा मोठा संशोधनाचा विषय बनलेला आहे.

या कार्यालय अंतर्गत असलेल्या किनवट तालुक्यातील दिगडी मंगाबोडी येथील आमदार निधी अंतर्गत करण्यात आलेल्या 15 लक्ष रुपयांचा बोगस आणि निकृष्ट दर्जाचा कामाची चौकशी करण्याची मागणी आणि ती पूर्ण होत नाही. तो पर्यंत बिल काढू नये अशी मागणी तक्रार धरकाने जून महिन्यात निवेदन देऊन केलेली होती. ज्यावर आज पर्यंत कोणतीही चौकशी तक्रार धारकासमोर करण्यात आलेली नाही आहे. आणि खुद्द प्रभारी अभियंता यांनी बिल काढू नये असे पत्र काढलेले असतानाही त्या कामाची देयके अदा करण्यात आलेली आहेत असे उघड झालेले दिसतं आहे.

सदरील निवेदनावर आज पर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभाग नांदेड (उत्तर) मार्फत कोणतीही चौकशी तक्रार धारक समोर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदरील प्रकरणी भ्रष्ट अधिकारी आणि गुत्तेदार यांच्यावर मा.मुख्याधिकारी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. किनवट उपविभाग कार्यालयात प्रभारी राज असल्याने साध्या माहिती अधिकार पत्रांना केराची टोपली दाखवली जात आहे.

सदरील दिगडी मंगाबोडी येथील आमदार निधी मधून करण्यात आलेल्या जुन्या रस्त्यावरील बोगस आणि निकृष्ट दर्जाचा सीसी रस्ता कामाची चौकशी तक्रार धारक समक्ष करत बोगस आणि निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदारला शासनाचा काळ्या यादीत टाकत आणि त्याला पाठबळ देणाऱ्या शाखा अभियंता यांचावर तात्काळ निलंबनाची कारवाई करत बोगस कामांना लगाम लावावी. आणि प्रभारी अभियंत्यांना तात्काळ कार्यमुक्त करत त्यांचा जागी पूर्ण वेळ उप अभियंता नेमत किनवट सारख्या अति मागास आदिवासी भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आनावे. या मागणीचे निवेदन दिलेली असतांनाही बोगस कामाची बिले निघतात..? म्हणजे कुठे तरी पाणी मुरत असेच दिसतं आहे.

सदरील प्रकरणी मा.मुख्याधिकारी जीप नांदेड यांनी कोणतीही दखल घेत नसल्याने नाईलाजाने लोकशाही मार्गाने दिनांक 03/10/2023 पासून त्यांचा कार्यालय समोर आमरण उपोषणाला सुरुवात करत असल्याचे निवेदनात तक्रारकर्ते विजय वाठोरे यांनी नमूद केलेले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version