उस्माननगर। येथील नालीतील घाण कचरा अडकून साचलेल्या घाणीकडे व जागोजागी कचऱ्याचे ढीगाकडे सत्ताधारी, लोकप्रतिनिधी , आणि प्रशासन व विरोधक मनांवर न घेता जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

मागील अनेक महिन्यांपासून गावातील नाल्यातील घाण कचरा काढण्यात आला नाही. यामुळे जागोजागी नाल्या तुडुंब भरले आहे. काही ठिकाणी तर कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासन दरवर्षी स्वच्छता अभियान अंतर्गत लाखो रुपये खर्च करित असते. ग्रामपंचायत स्तरावर भरपूर निधी देखील येत असतो. मागील महीन्यात उस्माननगर ग्रामपंचायत ला लाखो रुपये जमा झाले व मागील सरपंच यांच्या काळातील सुध्दा लाखो रुपये पडून असल्याचे लोकप्रतिनिधी मध्ये चर्चा होताना दिसत आहे.

प्रशासन सफाई कामगार साठी मोठे पाऊल का उचलत नाही ? असा प्रश्न नागरिका मध्ये पडला आहे. ग्रामपंचायत ही गावातील मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून गावपातळीवर ग्रामपंचायतची स्थापन करण्यात आली. गावातील वार्डावार्डातून नागरिक आपला लोकप्रतिनिधी निवडून देतात. पण लोकप्रतिनिधी हा मतदान मागण्या पूर्ता उरलेला दिसून येत आहे.

निवडून दिलेला लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी व सरपंच यांना आपल्या वार्डातील समस्याचे निवारण करण्यात नापास होताना दिसतात. पावसाळा सुरू झाला असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी व विरोधक गावातील नाल्यातील घाणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. जर वेळेवर नालीतील घाण काढली नाहीतर पुढील प्रसंगास प्रशासकीय अधिकारी जबाबदार असेल अशी नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.

पुढारी व स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आताच झालेल्या निवडणुकीसाठी मतदारांच्या पुढ मनधरणी करत आमच्या नेत्याला निवडून द्या ,म्हणत फिरले पण मतदान घेतले तसं गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्याच तळमळीने , तात्परतेने प्रयत्न करताना कोण्ही पुढे येत नाहीत … गावातील मुलभूत समस्या कडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version