नायगाव, रामप्रसाद चन्नावार| लोकोत्सव समिती नायगाव यांच्यावतीने आयोध्यावरून येणाऱ्या अक्षदा पूजन करण्यात आला आहे. नायगाव तालुक्यातील आलेले अक्षदाचे पूजन दि.22 आॅगस्ट सकाळी बालाजी मंदिर येथे वैकुंठ एकादशी निमित्त नरसी येथे करण्यात आले आहे .नियोजित कार्यक्रमात नरसी येथे आलेले अक्षदा चे फटाक्याचे अतिश बाजी लावून भगवान बालाजी मंदिर संयोजन समिती यांनी स्वागत केले आहे.
या वेळी लोकोत्सवसमितीचे मुख्य सयोजक गणेश पाटील कंदुरके. सहसयोजक नागेश मोरचोंडे माजी जिला परिषद सदस्य माणिक लोहगावे, श्रीराम सावकार मेडेवार,बाबुराव शकरवार, पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर, वसंत मेडेवार,गोविंद नरसीकर,तानाजी शेळगावकर, हणमंत चंदनकर,दत्ता पाटील ढगे, साईनाथ सावकार चिद्रावार , सदानंद मेडेवार, डॉक्टर जुक्कलकर, डॉक्टर पोलावार, विकास बच्चेवार, अनिल श्रीरामवार, अंकुश खनपटे, सोमेश शेटकर, नागेश मेटकर, शुभम साखरे, चंदू काचमवार, पांडुरंग खनपटे,नारायण देवसेटवार, पवन गादेवार, साईनाथ मद्रेवार, संतोष जुकलकर व मोठया प्रमाणात महिला भगिनींही उपस्तित होत्या.