हिमायतनगर। शहरातील लकडोबा चौक स्मशानभूमीचा कायापालट होत असून आमदार माधवराव पाटील जवळगावकर व खा.हेमंतभाऊ पाटील यांच्या निधीतून सी. सी. रस्ते व इतर विकासाची कामे होत आहेत. मागील काही दिवसांपुर्वी आमदार जवळगावकर व लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी याच स्मशानभूमीत विकास कामाचे भूमिपूजन केले होते. आता या ठिकाणी मोठ्याप्रमाणात विकासाची कामे वेगाने होत असून, आता नव्याने येथे महादेवाची मुर्ती बसविण्यात येणार असून, श्री परमेश्वर मंदिरातर्फे मूर्ती देण्यात आली असल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या भाविकांना आपसूकच महादेवाचे दर्शन लाभणार आहे.
हिमायतनगर येथे श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ हे शहरात धार्मिक वातावरण सातत्याने तयार करीत आहेत. परमेश्वर मंदिरात भाविक भक्तांसाठी मोठ्याप्रमाणात सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून, मंदिरांच्या वैभवात वाढ होण्याकरिता त्यांचे योगदान शहरातील कोणीच नागरीक नाकारू शकणार नाहीत. आता शहरातील काही युवकांनी पुढाकार घेऊन लकडोबा चौकातील हिंदू स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे. परिसरातील अनेक लोकांनी श्रमदानातून स्मशानभूमीची स्वच्छता करून कामाला सुरुवात केली आहे. हे पाहता हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी येथे दहा लाख रुपयांचा रस्ता मंजूर करून दिला. लकडोबा हिंदू स्मशानभूमीत सिमेंट रस्ता कामाला सुरुवात झाली आहे.
तसेच लोकप्रिय नेते बाबुराव कदम कोळेकर यांनी हिंदू स्मशानभूमीला भेट दिल्यानंतर त्यांनी हिंगोलीचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून हिंदू स्मशान भूमीच्या विकासासाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतील कामाला देखील लवकरच सुरुवात होणार असून, येथे प्रतिक्षालय, परिसराचा सुशोभीकरण, शेड, सुविधा कार्यालय, पाणी टाक व अन्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. ही सर्व कामे होत असताना येथे महादेवाची मूर्ती उभी करण्यासाठी स्मशान भूमी विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी ही भावना श्री परमेश्वर मंदिर कमेटिकडे व्यक्त केली. यावेळी उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी लागलीच होकार देऊन परमेश्वर मंदिराच्या पुढाकारातून विदर्भातील आर्णी येथून भव्य महादेवाची मुर्ती देण्याची तयारी दर्शविली. आणि आज दि.१७ शुक्रवारी महादेवाची विशाल मूर्ती हिमायतनगर येथे आणण्यात आली असून, लवकरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी सांगीतले.
यावेळी महाविरचंद श्रीश्रीमाळ, अनंतराव देवकते, तुकाराम मेरगेवाड, श्याम ढगे, ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराने, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, वामनराव मिराशे पाटील, गोविंद शिंदे, गजानन हरडपकर, श्रीकांत घुंगरे, बालाजी तोटेवाड, नागेश शिंदे, अनिल नाईक, आदिंसह अनेकांची उपस्थिती होती. लकडोबा हिंदू स्मशानभूमी विकास समितीचे सदस्य व गावातील नागरिक व बांधकाम कर्मचारी उपस्थित होते.