दिवाळीच्या पहाटेला यावर्षीही लाभणार भक्तिरसाचे सूर
नांदेड| गत १८ वर्षांपासून नांदेडच्या सांस्कृतिक वाटचालीत दिवाळीच्या भक्तिरसातील मानबिंदू ठरलेली गोदातटावरील दिवाळी पहाट याही वर्षी मोठ्या उस्ताहात साजरी होणार आहे.
याबाबत आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत या वर्षाच्या दिवाळी पहाट बाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आयुक्त मनपा आयुक्त डॉ महेश डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर पोलीस विभागाचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक घोरबांड, सांस्कृतिक नागरी समितीचे डॉ नंदकुमार मुलमुले, संपादक शंतनू डोईफोडे, वरिष्ठ पत्रकार विजय जोशी, चारुदत्त चौधरी, प्रा. सुनील नेरलकर, हर्षद शहा, डॉ सान्वी जेठवाणी, बापू दासरी, ऍड पिंपरखेडे, विजय होकर्णे, श्रीमती आंनदी विकास, बंडेवार, उमाकांत जोशी , लक्ष्मण संगेवार आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, गुरुद्वारा आणि दातृत्त्व ठेवणारे रसिक, कलासंस्था यांच्या समन्वयातून आजवर या कार्यक्रमाने एक आदर्श मापदंड निर्माण केला आहे. सांस्कृतिक नागरी समितीच्या सदस्यांनी केलेल्या विविध सूचना विचारात घेवून कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे. बैठकीत, कार्यक्रमाची रूपरेषा, प्रशासन स्तरावर करावयाच्या पुर्वतयारी अनुषंगाने नियोजनात्मक चर्चा करण्यात आली.
गोदावरीच्या काठावर अर्थात बंदा घाट येथे या भक्तिरसाच्या उत्सवात रसिकांना शास्त्रीय गायनाची अनुभूती घेता येईल. याच बरोबर भावगीते, कविसंमेलन, नृत्याचा कार्यक्रमांची मेजवाणी नांदेडकरांना अनुभवता येणार आहे. दिनांक १२ नोव्हेंबर १५ नोव्हेंबर या कालावधी हे विशेष आयोजन केले जात आहे. दिनांक १२ नोव्हेंबर व १५ नोव्हेंबर या दोन दिवशी सकाळी कार्यक्रमाचे आयोजन होईल. दिनांक १३ व १४ या दोन दिवशी सकाळी व संध्याकाळी कार्यक्रमाचे नियोजन निश्चीत करण्यात आले.
00000