नांदेड| सोमवार (दि.४) पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात सहभागी व्हावे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडावे यासाठी मंगळवारी (दि.५) शिवसेनेच्या सर्व खासदारांची दिल्लीत बैठक पार पडली. या वेळी शिवसेनेचे गट नेते तथा खासदार राहुल शेवाळे यांनी देखील खासदार हेमंत पाटील यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा मागे घेऊन संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडण्याची विनंती केली आहे.
सर्वत्र मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सकल मराठा समाज बांधवानी हदगाव येथे केली होती. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा खासदार पदाचा राजीनामा दिला होता. तस्सेच दिल्ली येथील छाटार्पटी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मराठा आरक्षणासाठी उपोषण मांडले होते. तत्पूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून खासदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. नुकतेच हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, त्यांनी लोकसभेच्या कामकाजाकडेही पाठ फिरविली. दरम्यान राष्ट्रपतींनी खा.हेमंत पाटील यांना समन्स बजावून उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ते ४ डिसेंबर रोजी लोकसभा अध्यक्षांपुढे हजर झाले. परंतु, त्यांनी अधिवेशनात सहभाग घेतला नाही.
सोमवार संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात सहभागी व्हावे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडावे यासाठी मंगळवारी (दि.५) शिवसेनेच्या सर्व खासदारांची दिल्लीत बैठक पार पडली. या वेळी शिवसेनेचे गट नेते तथा खासदार राहुल शेवाळे यांनी देखील खासदार हेमंत पाटील यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा मागे घेऊन संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडण्याची विनंती केली आहे. खासदार म्हणून लोकशाहीने आपणास जे अधिकारी दिलेले आहेत. त्या अधिकारांचा वापर करून आपण केंद्र सरकारवर दबाव आणून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत असे देखील खासदार राहुल शेवाळे यांनी खासदार हेमंत पाटील यांना विनंती केली आहे.