नवीन नांदेड। नवीन नांदेड भागातील हडको परिसरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यासाठी व विकासासाठी १ कोटी ५० लक्ष रूपये निधीची घोषणा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हडको येथील अयोध्या दुर्गा महोत्सव मंडळ महा आरती प्रसंगी केले.
हडको येथे २३ आक्टोबर रोजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,किरण वटमवार, संदीप चिखलीकर,सोनटक्के ,माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, संतोष वर्मा,अनिल बोरगावकर,डॉ.स्वामी यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थितीत होती, यावेळी महोत्सव मंडळ यांच्या वतीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भव्य दिव्य सत्कार व फटाक्यांचा, ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
यावेळी संजय पाटील घोगरे हे बातें कम,काम जादा करत असल्याचे सांगून रक्तदान शिबीर यासह विविध उपक्रमातून अनेक सामाजिक कार्य केले असल्याचे सांगून हडको भागातील अंतर्गत व मुख्य रस्ता सह विविध विकासासाठी संजय घोगरे व संदीप चिखलीकर यांच्या मागणी नुसार ही कामे करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रूपये विकास कामे घोषणा करून लवकरात लवकर ही कामे चालू होणार असल्याचे सांगितले. यावेळी संजय पाटील घोगरे, गजानन कते,कृष्णा मांजरमकर,योगेश स्वामी,मुनना शिंदे,ऊमेश स्वामी,अनिस घोगरे, प्रकाश घोगरे, सचिन चाकुरकर, जय काळे गोरे, रूपेश यमलवार, यांच्या सह मंडळ पदाधिकारी याची उपस्थिती होती. हडको भागातील वैभव दुर्गा नवरात्र महोत्सव गोविंद गार्डन, शिवनेरी दुर्गा महोत्सव शिवाजी उधाण, साई नवदुर्गा महोत्सव साई बाबा नगर व अयोध्या दुर्गा महोत्सव मंडळ येथे महाआरती केली.
हडको येथील साईबाबा नगर येथील साई दुर्गा नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या वतीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भव्य सत्कार अध्यक्ष बाळु पाटील हातणीकर ,कोषाध्यक्ष श्रीकांत पांडे,सचिव भास्कर शास्त्री ,कल्याणकर, व दुर्गा माता मंडळाचे बंडुभाऊ जोशी ,मुनाभाऊ डाहाळे,शिवानंद सांगवीकर, रुपेश यनावार ,दिलीप सोळंके,शंतनू खलशे,संकेत कोंढाशे व सर्व सदस्य व सर्व महिला भजनी मंडळ व सर्व साई नगर वासीयांनी केला.यावेळी खासदार चिखलीकर यांनी अंतर्गत रस्ता व सभागृह बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले.