श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन आलेल्या मामुली पावसात अंगावर विज कोसळून संजय कृष्णकुमार पांडे (वय ५६ वर्षे )रा. करंजी ता. माहूर हे शिक्षक ठार झाले तर दुसऱ्या एका घटनेत असोली येथे भुईमूगाच्या शेंगा गोळा करीत असतांना अमरसिंग रामजी चव्हाण (वय ५५ वर्षे ) हे सालगडी जखमी झाले. सदरची घटना गुरुवार दि.१५ मे रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास घडली.

विदर्भातील हिवरा संगम येथील जि. प. च्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले संजय पांडे हे शिक्षक करंजी ता.माहूर या मुळगावी परत जात असतांना माहूर शहरापासून २ किमी अंतरावर मालवाडा घाटात त्यांच्या अंगावर विज कोसळली त्यात ते जागीच ठार झाले. दुसऱ्या एका घटनेत असोली येथे शेतात भुईमूगाच्या शेंगा गोळा करीत असतांना अमरसिंग चव्हाण (रा. असोली ता. माहूर )यांच्या अंगावर विज कोसळली त्यात ते गंभीर जखमी झाले. दोघांनाही माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता,डॉक्टरांनी पांडे यांना मयत घोषित केले.

अमरसिंग चव्हाण यांचेवर वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बिपीन बाभळे, परिचारिका पूजा तरटे, रंजना साबळे, आरती शिंदे, परीचर शेंडे हे उपचार करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पो. नि. शिवप्रकाश मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली. शिक्षक पांडे हे फोन घेत असतानाच त्यांच्यावर विज कोसळली असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version