हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव तालुक्यातील गोजेगाव वाटेगाव सह तालुक्यातील शासकीय गायरान जमीन देवस्थान वक्फबोर्ड जमीनी ताब्यात घेण्याचे आदेश तालुक्याच्या उपविभागीय आधिकारी यांनी एका पञाद्वरे तहसिलदार यांना आदेशित केले आहे.

त्या अनुशंगाने तहसिलदार हदगाव यांनी तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी यांना एका पञा द्वरे या संबधी कारवाई करण्याचे आदेश जारि केले आहे. तहसिलदार यांनी जारी केलेल्या पञात म्हटले आहे की, सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघमारे, के.डी. पवार यांनी या संबधी निवेदन दिल्याचे नमुद करुन त्यांनी म्हटले आहे की, हदगाव तालुक्यातील गोजेगाव, वाटेगाव, तालुक्यातील शासकीय जमीन देवस्थान वक्फ बोर्ड व इतर शासकीय जमीनीवर लगतच असलेल्या गटनंबर मधील शेतमालक व ईतर लोकांनी गेल्या अनेक वर्षापासुन अवैध ताबा करुन जमीन हडपल्या आहेत.

अश्या जमीनीची तात्काळ चौकशी करुन जमीनीचे सिमांकन करुन ताब्यात घेण्या संबधी निवेदन कर्त्याचे म्हणाने आहे. या अनुषंगाने चौकशी करुन सविस्तर या संबधीचा अहवाल आपल्या अभिप्राययसह त्वरीत तहसिल कार्यालय मध्ये सादर करण्याचे आदेश तहसिलदार हदगाव यांनी जारी केले आहे.

तहसिलदार याचां आदेश व मंडळ अधिकारी …!
हदगाव तालुक्याचे तहसिलदार यांनी पञ क्र २०२३/जमा/जमीन/सीआर दि.१७ नोव्हे २०२३ च्या पञानुसार तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारीच्या नावे पञ जारी केले आहे. या पञामध्ये तालुक्यातील गोजेगांव वाटेगाव व तालुक्यातील इतर शासकीय गायरान जमीन देवस्थान वक्फ बोर्ड व इ लोकांनी गेल्या अनेक वर्षापासून ताबा करुन जमीन हडप केल्या अश्या जमीनीची तात्काळ चौकशी करुन जमीनीचे सिमांकन करुन जमीन ताब्यात घेवून सविस्तर अहवाल आपल्या अभिप्रायासह अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते. आज एक महीना होत असला तरी अध्यापही तालुक्यातील मंडळ निरक्षकांनी अहवाल दिला नसल्याचे विश्वासनिय माहीती आहे. सदर शासकीय जमीनी ह्या बड्या धनाड्य व्यक्तीकडे असल्याने या मंडळ अधिका-यावर अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version