
कंधार, सचिन मोरे। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या कंधार तालुका अध्यक्षपदी सुनिल देशमुख तर सचिव पदी सतीश गोगदरे उपाध्यक्ष बालाजी डफडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे,
दि.९ ऑक्टोबर रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय,कंधार येथे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेची विशेष बैठक पार पडली.सदर बैठकीत चर्चा होऊन तालुका शाखेतील रिक्त पदांवर नविन पदाधिकार्यांची नवनियुक्ती करण्याचे सर्वाणुमते ठरवण्यात आले. या बैठकीत संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी तालुक्यात कृषि सहाय्यक पदावर प्रदिर्घ काळ काम केलेले, सर्वांच्या अडचणी समजुन घेवुन योग्य तो मार्ग काढणारे अनुभवी सुनिल गोविंदराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिव पदी सतिश शंकरराव गोगदरे उपाध्यक्षपदी बालाजी डफडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदरील बैठकीस महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या महिला जिल्हा प्रतिनिधी सौ. कल्पना जाधव,जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराव वडजे,तालुका कार्याध्यक्ष शिवाभाऊ होनराव, वसंतराव मिटके, संजय गुट्टे, मधुकर राठोड, गोविंद यलपुरवाड, पल्लवी कचरे, सतिष वाघमारे, भुषण पेठकर, नामदेव कुंभारे,ईंगेवाड व तालुक्यातील सर्वच कृषि सहाय्यक कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थिती होते. नवनियुक्त सर्व पदाधिकार्यांचे कंधार तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते व उपस्थित सर्वांनी अभिनंदन केले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर मोरे यांनी केले व गोविंद तोटेवाड यांणी आभार मानुन बैठकीची सांगता केली.
