नांदेडसोशल वर्क

सिटू आणि डी.वाय.एफ.आय. चे समाज कल्याण कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे

नांदेड। भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२४ या शैक्षणिक वर्षापासून विध्यार्थ्यांना धक्का देणारा आणि जाचक शासन निर्णय समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्या मार्फत काढून विध्यार्थ्यांना अस्वस्थ करणारे संदेश पाठविण्यात आले होते.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू )आणि डेमो्क्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया डी.वाय.एफ.आय. कडे पालक आणि विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती.

त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन दि.६ मार्च रोजी सिटू आणि डी.वाय.एफ.आय. संघटनेच्या वतीने समाज कल्याण नांदेड कार्यालया समोर एकदिवशीय धरणे सुरु केले होते. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या सोबत शिष्टमंडळाने चर्चा केली आणि स्वाधार ची जाचक अट रद्द केल्याचे लेखी पत्र संघटनेस देण्यात आले. त्यामुळे समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी लागू केलेली जाचक अट रद्द करण्यात आली.

या धरणे आंदोलनासाठी सिटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, डी.वाय.एफ.आय. तालुका निमंत्रक नांदेड, कॉ.शाम ए. सरोदे, डी.वाय.एफ.आय.शहर निमंत्रक कॉ.जयराज गायकवाड, कॉ. विजय सरोदे, कॉ.दिलीप कंधारे. व्यंकटराव सोनटक्के, कॉ. सचिन वाहुळकर, कॉ. गंगाधर खूने. आदीसह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!