आदिलाबादमध्ये फिटलाइन सुरू झाल्यानंतर सर्व गाड्या आदिलाबादहून सोडाव्यात – गौतमचंद पिंचा

हिमायतनगर| आदिलाबाद – मुदखेड मार्गावर, आदिलाबादमध्ये एफआयटी म्हणजे फिटलाईन कार्यान्वित झाल्यानंतर, सर्व गाड्या आदिलाबाद येथून सोडण्यात याव्यात जेणेकरून प्रवाशांची गैरसोय टाळता येईल. अशी मागणी डीआरयूसीसीचे माजी सदस्य गौतमचंद सूरजमल पिंचा यांनी के. नागभूषण यांच्या मार्फत विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड नीती सरकार यांच्याकडे केली आहे.
DRUCC चे माजी सदस्य गौतम चंद सूरजमल पिंचा यांनी हिमायतनगर येथे 26 तारखेला आयोजित केलेल्या अमृत रेल्वे स्थानकाच्या उभारणीच्या उद्घाटन दिनी उपस्थित झालेले के.नागभूषण यांना निवेदन दिले असून, त्यामध्ये त्यांनी सहा मागण्या लिहिल्या आहेत. ज्यात 1. तपोवन एक्सप्रेस ट्रेन क्रमांक १७६१८ आदिलाबाद येथून सोडावी. २) पनवेल एक्स्प्रेस ट्रेन क्र. १७६१४ आदिलाबाद येथून सोडावी. 3) ट्रेन क्रमांक १७६११ मुंबई CSMT राज्य राणी आदिलाबाद येथून सोडावी. ४) ट्रेन क्रमांक १६५९४ KSR बेंगळुरू एक्स्प्रेस आदिलाबादहून सोडावी. ५) ट्रेन क्र. ०७७७७ मनमाड एक्स्प्रेस आदिलाबादहून सोडावी. 6) ट्रेन क्रमांक २२७२३ श्री गंगानगर एसएफ एक्सप्रेस आदिलाबादहून सोडावी. अशा मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्यांचे पत्र खासदार प्रताप्रवजी पाटील चिखलीकर, (नांदेड लोकसभा), खासदार हेमंतभाऊ पाटील, (हिगोली लोकसभा) आणि खासदार सोयाम बापूराव, (आदिलाबाद लोकसभा) यांना पाठवले आहे. यावेळी श्री परमेश्वर मंदिर विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमल, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, भाजपा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन चायल, शहरप्रमुख गजानन हरडपकर, सभापती गणेशराव शिंदे, रामेश्वर पाकलवाड, लक्ष्मण डांगे, दशरथ हेंद्रे, दुर्गेश मांडोजवार, आदींसह हिमायतनगर शहरातील नागरिक, पत्रकार, रेल्वे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
