नवीन नांदेड। उप विभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) यांच्या गुन्हे शोध पथकाची एक गावटी पिस्टल व 03 जिवंत काडतुस सह इतर गुन्हयातील मुद्येमालसह 1,78,000 रुपये किंमतीची मुद्येमाल जप्त करुन एका आरोपीस अटक केली असुन, या प्रकरणी उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल वरीष्ठ अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

श्रीकृष्ण कोकाटे,पोलीस अधिक्षक नांदेड,अबिनाश कुमार,अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड आदेशाने रेकॉर्ड वरील,पाहिजे,फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशयित हाल चालीवर लक्ष ठेवणे करीता आदेशीत केल्या प्रमाणे सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शन व सुचने वरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना अर्जुन मुंडे, पोकॉ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड,श्रीराम दासरे, यांनी आज दिनांक 07 मे 24 रोजी रात्री 12.45 वाजताच्या सुमारास लुटे मामा चौक, लुटे मामा पाटी जवळ येथे मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन छापा टाकुन आरोपी नामे हरीश ऊर्फ ह-या देविदास शर्मा वय 23 वर्ष व्यवसाय बेकार रा. गोवर्धन घाट ब्रिज खाली नांदेड यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातील विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले 01 गावठी पिस्टल व 03 जिवंत काडतुस मिळुन आल्याने ते जप्त केले आहेत.

यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हा नोंद क्रमांक 357/24 कलम 3/25, शस्त्र अधि नियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि महेश गायकवाड करीत आहेत. तसेच त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केले असता त्याने सांगितले की मागिल सात ते आठ महिन्यापुर्वी मंत्रीनगर जागृत हनुमान मंदिरं जवळ चैन स्नॅचिंग केले असल्याची सांगितले यावरुन पोलस स्टेशन भाग्यनगर अभिलेखा वर माहिती काढले असता पोलीस स्टेशन भाग्यनगर गुरन 306/2024 कलम 392,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे तसेच सदर आरोपी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण गुरन 562/2023 कलम 379,34 भादवि, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण 812/2023 कलम 395,34 भादवि, मध्ये पाहिजे असल्याचे निष्पन झाले.

सदर कार्यवाही बाबत श्रीकृष्ण कोकाटे,पोलीस अधिक्षक नांदेड,अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड व ईतर वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा यांचे कौतुक केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version