नांदेड। महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेअंतर्गत बीड जिल्हा धनुर्वीद्या संघटनेच्या वतीने परळी येथे 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 दरम्यान आयोजित 20 व्या वरिष्ठ गट राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धेत नांदेडच्या कुमारी सृष्टी बालाजी पाटील जोगदंड हिने रिकव्हर प्रकारात सर्वाधिक 628 गुण मिळवीत सुवर्णपदक मिळवले. तिच्या पाठोपाठ पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात सरदार तेजवीरसिंग जहागीरदार यांने सर्वाधिक 704 गुण घेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर अवघ्या पंधरा वर्षाच्या ज्ञानेश चेरलेने देखील वरिष्ठ गटात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत 628 गुण घेत चतुर्थ क्रमांक पटकावला . या तिघांचेही जिल्हा संघटना सचिव तथा प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

या तिघांचीही 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान अयोध्या,उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच कामगिरीमुळे गोवा येथे आयोजित होणाऱ्या 37 व्या नॅशनल गेमच्या निवड चाचणीतही यांचा समावेश असणार आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे भारतीय धनुर्वीद्या संघटनेचे महासचिव प्रमोद चांदूरकर, भारतीय खेळ प्राधिकरणाचे सहाय्यक संचालक विनीत कुमार , ऑलम्पिक प्रशिक्षक रविशंकर सर , ब्रिजेश कुमार ,महेंद्रसिंग सरदार माजी महापौर जयश्रीताई पावडे , प्रशिक्षिका पिंकी राणी, अध्यक्ष श्रीनिवास भुसेवार, कोषाध्यक्ष सुरेश पांढरे,स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे,उपाध्यक्ष मुन्ना कदम, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ . मनोज रेड्डी, डॉ . दिलीप भडके, रणजीत चांमले, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार,चंद्रप्रकाश होनवडकर, डॉ . हंसराज वैद्य ,संतोष कणकावर,संजय चव्हाण, सहसचिव नारायण गिरगावकर, पुरुषोत्तम कामतगीकर, बाबुराव खंदारे , विक्रांत खेडकर , शिवानंद लिंगायत , ज्ञानोबा नागरगोजे,

प्राध्यापक जगदीश खाडे , शिवाजी पुजरवाड ,मालोजी कांबळे , शिवाजी केंद्रे,प्रेम जाधव ,गंगालाल यादव , किशोर पाठक, देविदास इंगोले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, डॉ . अविनाश बारगजे ,डी जी. मेश्राम ,प्रफुल डांगे प्रवीण गडदे , सोनल बुंदेले , गिरीश कुकडे,शैलेश कुलकर्णी , शिवानंद लिंगायत ,गणेश विश्वकर्मा ,पवन तांबट,बालाजी चेरले , अशोक मोरे ,लता कलवार, गजानन फुलारी जयपाल रेड्डी ,डॉ विठ्ठल सिंग परिहार ,शिवकांता देशमुख ,सतीश पाटील जाधव ,रंगराव साळुंखे अॅड अरुण फाजगे,सरदार चरणकमलजीत जहागीरदार , राजेंद्र सुगावकर , शिवाजी पाटील इंगोले इत्यादींसह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत . आर्चरी स्कूल नांदेड च्या सृष्टी जोगदंडला तिची आई तथा प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांचे मार्गदर्शन लाभले तर ज्ञानेश चेरले यास त्याचे वडील बालाजी चेरले , सरदार तेजवीर सिंग जहागीरदार यास चंद्रकांत ईलग यांचे मार्गदर्शन लाभले .

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version