नांदेड। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील खेळाडू वसीम खान यांनी 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये 600 पैकी 592.6 गुण घेऊन दुसऱ्यांदा नॅशनल रेनॉल्ट शूटर होण्याचं मान मिळविले आहे. या यशाबद्दल सर्व जिल्ह्यामध्ये अभिनंदन व कौतुक केलं जात आहे.

15-11-2023 ते 24-11-2023 या कालावधीत दिल्ली येथे झालेल्या 66 राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत हिमायतनगर तालुक्यातील खेळाडू वसीम खान या खेळाडूने जिद्द, चिकाटी, नियमित सराव व शास्त्रशुद्ध प्रशिक्षनाच्या बळावर दुसऱ्यांदा 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये 600 पैकी 592.6 गुण घेऊन नॅशनल रेनॉल्ट शूटर होण्याचा बहुमान हे यश मिळविला आहे. 50 मीटर प्रोन पुरुष वैयक्तिक स्पर्धेतून त्यांना हे यश मिळाला आहे.

वसीम खान यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे वडी जबी खान ,कोच अहेमद खान विकी सिंग मेजर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, पोलीस निरीक्षक भुसनुर, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान, रमेश गांजा पुरकर ,अथर बॅग रफिक भाई, वसीम भाई, हबीब चाऊस, अमर चाऊस, माणिक देशमुख तरोडेकर, हुसेन पैलवान, क्रऊबा सभापती जनार्धन ताडेवाड, संचालक संदीप पळशीकर, माजी सभापती परमेश्वर गोपतवाड, माजी संचालक रफीक सैठ. माजी नगराध्यक्ष अखिल भाई, माजी जी प सदस्य सुभाष राठोड, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, शहराध्यक्ष संजय माने, डिजिटल मीडिया परिषद नांदेड कार्याध्यक्ष अनिल मादासवार, जिल्हा संघटक प्रकाश जैन, हिमायतनगर तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष दत्ता शिराने, सचिव सोपान बोंपिलवार आदिंसह अनेकांनी अभिनंदन केल आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version