नवीन नांदेड। यूपीएससी 2023 या परीक्षेत यश प्राप्त केलेले शुभम सत्यनारायण रेकुलवार Air 790 राहणार मुतनूर तालुका इंद्रवेली जिल्हा आदिलाबाद तेलंगाना यांचा भव्य सत्कार कलाल गौंड तेलंग समाज युवा प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने करण्यात आला.

कलाल समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे व शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदे प्राप्त करून समाज व राष्ट्रची सेवा करावी असे आव्हान शुभम रेकुलवार यांनी केले. याप्रसंगी शुभम यांनी स्पर्धा परीक्षेचे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन सुद्धा केले. याप्रसंगी शुभम चे वडील सत्यनारायण रेकुलवार यांनी आपल्या मुलाला कशा पद्धतीने उच्च शिक्षण देताना अनेक अडचणींना तोंड देऊन प्रसंगी शैक्षणिक कर्ज घेऊन मुलाला शिक्षण दिल्याचे याप्रसंगी आपले अनुभव कथन केले.

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी किंवा आपल्या ग्रामीण परिस्थितीचा न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेमध्ये उतरले पाहिजे ते नक्कीच राष्ट्रीय स्तरावर यशस्वी होतील असे याप्रसंगी माझी उपायुक्त शशी मोहन नंदा यांनी स्पष्ट केले,बहुजन समाज हा जाती जमातीमध्ये विखुरला असला तरी त्यांनी शिक्षण हा केंद्रबिंदू मानून समाजाला शिक्षित करण्यावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा व परिवर्तनवादी विचारांचा स्वीकार करावा तरच समाजात प्रगती करेल असे याप्रसंगी उत्तम सोनकांबळे माजी सहसंचालक कोषागार यांनी स्पष्ट केले.

कलाल समाजातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी आंबेडकरवादी मिशन मदत करेल याचा लाभ समाजा तील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आव्हान याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना कॉ,उज्वला पडलवार रामेश्वर गोडसे,बालाजी गोडसे, कलाल, गौड,तेलंग समाज युवा प्रतिष्ठान ,नांदेड चे संस्थापक अध्यक्ष सुनिल अनंतवार आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आंबेडकरवादी मिशन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सत्कार सोहळ्यास कलाल गौंड तेलंग समाजातील अनेक मान्यवर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात प्रामुख्याने माजी उप आयुक्त शशीमोहन नंदा, उत्तम सोनकांबळे माजी सहसंचालक कोषागार, व्यंकटेश पाटील,निखिलेश रेकुलवार बँक मॅनेजर , निलेश रेकुलवार ,बालाजी सुंदरगिरवार,अशोक पडलवार ,गंगाधर नंदेवाड , रामेश्वर गोडसे, बालाजी गोडसे,सुमित गोडसे,अनिल पडलवार ,लक्ष्मीकांत सुंदरगिरवार,उल्हास सुदेगुणेवार ,भारत कन्नलवार ,विजय खुणेवाड, सुधीर भुरेवार ,आनंद निळकंठवार,दिलीप चंदनवार,बालाजी अनंतवार गणेश नंदेवार, नागनाथ कुच्चेवार,शंकर रायपलवार महेश निळकंठवार, उज्ज्वला पडलवार,प्रियंका अनंतवार, पूजा नातेवार,आरती नंदेवार,अंजली अनंतवार ज्ञानेश्वर ईबीतवार,बुधाजी नातेवाड आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. बाबाराव नंदेवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आंबेडकर वादी मिशन मधील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version