नांदेड

शहीद जवान कामेश कदम यांच्या पार्थिव देहावार अंत्यसंस्कार,अमर रहे भारत माता कि जय घोषणा परिसर दणाणून गेला

नवीन नांदेडl हडको येथील रहिवासी असलेले बीएसएफ जवान तथा नाईक पदावर कार्यरत असलेले कामेश विठ्ठलराव कदम यांच्या पार्थिवदेहावार शासकीय ईतमांत सिडको येथील स्मशान भुमित ११ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले,यावेळी शासनाच्या वतीने तहसीलदार संजय वारकड व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, बीएसएफ जवान, पोलीस दल यांच्या वतीने सलामी देण्यात आली.

हडको येथील व बीएसएफ मधील जवान कामेश कदम हा गुडगाव हरियाणा येथे सेवेत कार्यरत असतांना ८ जुलै रोजी सायंकाळी ९ वाजता हृदयविकाराचा झटक्याने विरमरण आले,शहीद झाल्याचे वृत कळताच सिडको हडको परिसरात शोककळा पसरली, कामेश कदम यांच्ये पार्थिवदेह हरियाणा मार्ग हैदराबाद येथे विमानाने रात्री उशिरा ११ रोजी आले,या नंतर बीएसएफ च्या वाहनाने हैदराबाद मार्ग सकाळी आठ वाजता चंदासिंग कॉनर , एम.आय.डी.सी.चौक नांदेड येथे वाहनाने पार्थिव देह येताच नगरसेवक प्रतिनिधी संजय पाटील घोगरे यांच्या उपस्थितीत शेकडो युवक व नातेवाईक यांनी अमर रहे,भारत माता कि जय घोषणा दिल्या, बळीरामपुर, माता रमाई चौक,महाराणा प्रताप चौक,क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णाभाऊ साठे, ज्ञानेश्वर नगर, हडको मार्ग निवास स्थानी मृतदेह नेण्यात आला, यावेळी उपस्थित हजारो समाज बांधव नातेवाईक यांना अश्रू अनावर झाले, पार्थिव देवाचे दर्शन व आंदरजली अर्पण करण्यासाठी ठेवण्यात आला होता. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
आ.मोहनराव हंबर्डे यांच्ये प्रतिनिधी राहुल हंबर्डे, मनपा विरोधी पक्षनेते जीवनराव पाटील घोगरे,बालाजी पांडागळे,
माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,नगरसेवक प्रतिनिधी सुभाष रायबोले, संदीप सोनकांबळे, सिध्दार्थ गायकवाड, सुरेश गायकवाड, फारुख अहमद विठ्ठल गायकवाड,नरेंद्र गायकवाड माधव पाटील ढाकणीकर, नगरसेविका डॉ.करूणा जमदाडे,सौ.चित्रा गायकवाड, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने,यांच्या सह उपस्थित सामाजिक राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व नागरीक यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

हडको येथील निवासस्थाना पासून त्रिशरण पंचशील वंदना घेऊन वैकुंठ रथातून अंतयात्रेला मुख्य मार्गाने सुरूवात करण्यात आली यावेळी हडको येथील इंग्रजी शाळेच्या लहान मुलांनी पुष्पवृष्टी करत अमर रहे घोषणा दिल्या तर हडको येथील इंदिरा गाधी हायस्कूल विधार्थी यांनी पुष्पवृष्टी करून भारत माता कि जय घोषणा दिल्या. मुख्य मार्गावर दुतर्फा नागरीक ,युवक महिला व विविध प्रतिष्ठान यांच्या वतीने पुष्पवृष्टी करून आंदरजली अर्पण केली,यावेळी परिसरातील व्यापारी यांनी प्रतिष्ठान बंद ठेऊन श्रध्दाजंली अर्पण केली. सिडको वैकुंठ धाम येथे आकरा वाजता नांदेड तहसीलदार संजय वारकड, मंडळ अधिकारी धुळगंडे, आंबेडकरवादी मिशनचे दिपक कदम,आजी माजी सैनिक यांच्या सह सामाजिक संघटना उपस्थित यांनी आंदरजली अर्पण केली.

जवान कामेश कदम यांच्या पार्थिव देहावार असलेला तिरंगा ध्वज आई वडील यांच्या कडे बीएसएफ अधीकारी यांनी दिला तर बीएसएफ व नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली, यावेळी अमर रहे, भारत माता की जय घोषणांनी परिसर दणाणून गेला.शोकाकुल वातावरण मध्ये लाडक्या जवान कामेश कदम यांच्या पार्थिव देहावार अंत्यसंस्कार करण्यात आले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!