
नांदेड। पो.स्टे. नांदेड ग्रामीण हद्दीत येणाऱ्या मिलतनगर येथील घरफोडीच्या गुन्हयातील एक आरोपीस 1,38,000/- रुपयाचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा नांदेडने अटक केली आहे, या कार्यवाही मुळें पोलिसांचं अभिनंदन केले जाते आहे.
नांदेड शहरात घरफोडीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. दिनांक 04/06/2024 रोजी स्थागूशा चे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, मिलतनगर, नांदेड येथे चोरी केलेला आरोपी मिलतनगर, नांदेड येथे त्याचे राहते घरी असल्याची माहीती मिळाली.
त्यावरून स्थागुशाचे पथकाने मिळालेल्या माहीती प्रमाणे आरोपी नामे शेख नदीम शेख शमशोद्यीन वय 19 वर्ष व्यवसाय बेकार रा. मिलतनगर, नांदेड यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी मिलत नगर, नांदेड येथे चोरी केल्याचे सांगीतले. सदर प्रकरणात पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 452/2024 कलम 454, 457, 380 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा नोंद आहे. मिळुन आलेल्या आरोपीकडुन गुन्हयातील सोन्याचे नेकलेस एकुण 22.80 ग्रॅम सोने व नगदी 15000/- असा एकुण 1,38,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे पुढील तपासकामी देण्यात आले आहे. नमुद आरोपीकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि/आनंद बिचेवार, पोना/संजिव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, पोकों/ बालाजी यादगीरवाड, मोतीराम पवार व चालक शेख कलीम व हेमंत बिचकेवार स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
